Ajay Bhosale News : गोळीबाराचा मास्टरमाइंड अगरवालच, छोटा राजनच्या शूटर्सनं झाडल्या अजय भोसलेंवर गोळ्या

Chhota Rajan Firing Ajay Bhosale : भोसलेंवर 'टू-व्हिलर'वरून आलेल्या दोघांनी अजय भोसलेंच्या दिशेने गोळीबार केला आणि पळ काढला. पण...
Ajay Bhosale | chhota rajan
Ajay Bhosale | chhota rajan sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 22 May : 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (जुनी राष्ट्रवादी) उमेदवार बापू पठारेंना 'चॅलेंज' करीत, थेट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशावरून पुण्यातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अजय भोसले ( Ajay Bhosale ) रिंगणात उतरले. आमदारकीसाठी ताकद लावलेल्या बापू पठारेंना ( Bapu Pathare ) चितपट करण्याच्या हेतुने शिवसेनेने आणि अजय भोसले यांनी जंगजंग पछाडले होते. राष्ट्रवादीची ताकद असलेल्या वडगावशेरी मतदारसंघात या निवडणुकीत चत्मकार होईल आणि अजय भोसले आमदार होऊ शकतात, याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली होती.

या निवडणुकीतला प्रचार टोकाला जात असतानाच, 11 नोव्हेंबर 2009 मध्ये सकाळी 10.30 वाजता 'टू-व्हिलर'वरून आलेल्या दोघांनी अजय भोसलेंच्या दिशेने गोळीबार केला आणि पळ काढला. या हल्ल्यात अजय भोसले बचावले. मात्र, हा गोळीबार राजकीय वैरातून झाल्याचे तेव्हा बोलले गेले. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील संघर्ष वाढण्याची भीतीही त्याकाळी होती. प्रत्यक्षात गोळीबाराच्या तपासाची चक्रे फिरली आणि जमिनीच्या वादातून अजय भोसलेंवर गोळीबार झाल्याचे उघड झाले. या हल्ल्यामागे राजकीय नेते नव्हे; तर पुण्यातील बिल्डर सुरेंद्र अगरवाल असल्याचे उघड झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुरेंद्र अगरवाल 'हिट अ‍ॅण्ड रन' प्रकरणात अटकेत असलेल्या विशाल अगरवाल ( Vishal Agarwal ) यांचे वडील आहेत. अजय भोसलेंवर हल्ला करण्यासाठी सुरेंद्र अगरवाल ( Surendra Agarwal ) यांनी थेट अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीशी हातमिळवणी केल्याचेही तपासातून पुढे आले. या घटनेत अगरवाल यांना अजय भोसले यांना संपवायचेच होते, असेही तपासात स्पष्ट झाले.

पुण्यातील 'हिट अ‍ॅण्ड रन' प्रकरणाने अर्थात, दारुच्या नशेत 'धूम' स्टाइल 'ड्रायव्हिंग' करीत दोघांना चिरडलेल्या घटनेने अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतरच्या तपासात अगरवाल कुटुंबियांचे कारनामे उघड होऊ लागले आहेत. त्यात अगरवाल यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे स्पष्ट आहे. सुरेंद्र अगरवाल यांचे भाऊ रामकुमार अगरवाल यांच्यासोबतच्या जमिनीच्या व्यवहारातून अजय भोसलेंवर हल्ला करण्यात आला. यामागे सुरेंद्र अगरवाल यांचाच हात असल्याचे लपून राहिलेले नाही.

Ajay Bhosale | chhota rajan
Pune Porsche Accident News : दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलानं दोन तासात पबमध्ये उडवली 'एवढी' रक्कम

नेमकं प्रकरण काय?

11 नोव्हेंबर 2009 रोजी तत्कालीन नगरसेवक अजय भोसले सकाळी 10.30 वाजता निवडणुकीच्या प्रचाराला जात होते. तेव्हा, कोरेगाव पार्क येथे त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत त्यांचा चालक शकील सय्यद जखमी झाले होते. या गुन्ह्यात आरोपीचा तपास न लागल्यामुळे या प्रकरणाचा पुणे पोलिसांना छडा न लागल्याने हा गुन्हा 'सीआयडी'कडे सोपविण्यात आला होता.

'सीआयडी'नं डिसेंबर 2010 मध्ये गोळीबार करणाऱ्या दोघांची नावे निष्पन्न केली होती. मात्र, त्यांना सुपारी कोणी दिली, या हल्ल्यामागे कोण आहे, याचा शोध न लागल्यानं अजय भोसले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. नंतर न्यायालयानं या गुन्ह्याच्या तपास 'सीबीआयक'डे दिला होता. 'सीबीआय'ने तपास केल्यानंतर बांधकाम व्यावसायिक रामकुमार अगरवाल आणि एस. के. अगरवाल यांच्यातील कौटुंबीक मालमत्तेवरून वाद होता. त्यात छोटा राजन याने अजय भोसले यांना मध्यस्थी करण्यास सांगितले होते. परंतु, तो त्यांचा कौटुंबीक प्रश्न असल्याने भोसले यांनी मध्यस्थी करण्यास असमर्थता व्यक्त केली होती.

त्यानंतर रामकुमार अगरवाल यांच्याबरोबर अजय भोसले सतत असतात, या कारणावरुन एस. के. अगरवाल यांनी छोटा राजनला भोसले याची सुपारी दिल्याने निष्पन्न झाले. छोटा राजनला भारतात आणल्यावर पोलिसांनी अटक केली. 'सीबीआय'ने त्याच्याकडे केलेल्या चौकशीत ही बाब समोर आली असल्याचे निष्पन्न झाले आहे. 'सीबीआय'ने एस. के. अगरवाल यांच्या अटकपूर्व जामिनास विरोध करताना न्यायालयात ही गोष्ट सांगितली होती.

( Edited By : Akshay Sabale )

Ajay Bhosale | chhota rajan
Pune Porsche Accident News : पब चालविणे गंमत आहे का? न्यायालयाचे खडेबोल; नेमकं काय घडलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com