Anil Deshmukh
Anil Deshmukh  Sarkarnama
पुणे

Pune Porsche Accident : 'त्या' तरुण- तरुणीला मद्यधुंद दाखवण्याचा प्रयत्न अनिल देशमुखांचा खळबळ जनक दावा

Chaitanya Machale

Pune News : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये पोर्श कारच्या धडकेने जे दोन युवक आणि युवती मृत्युमुखी पडले.

ते अपघाताच्या वेळी दारू प्यालेले होते, असा दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने ही गाडी चालवून हा अपघात केला त्याला वाचविण्यासाठी हा अट्टाहास केला जात असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या 17 वर्षीय मुलाने भरधाव वेगाने पोर्श कार चालवून एका दुचाकीला जोरदार धडक दिली होती. मागील महिन्यात हा प्रकार घडला होता.

या अल्पवयीन मुलाने जेव्हा या दुचाकीला धडक दिली त्यावेळी त्याने भरपूर प्रमाणात दारू प्यायली होती. या अपघातामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या युवक युवतीचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी या अल्पवयीन मुलाला आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना आणि ड्रायव्हरला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

हा अल्पवयीन मुलगा बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असल्याने सुरुवातीपासूनच त्याला वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर स्थानिक आमदार आणि देखील मध्यरात्री पोलीस (Police) स्टेशनमध्ये जाऊन या मुलाला सोडावे यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला जात आहे.

या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये पिझ्झा बर्गर देखील पुरविण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यातच सुरुवातीच्या काळात या मुलाला बाल न्याय मंडळाने 15 तासातच जामीन मंजूर केला होता. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर देखील शंका घेत जोरदार टीका करण्यात आली होती.

त्यानंतर बाल न्याय मंडळाने आपला निर्णय रद्द करत या मुलाची रवानगी बालसुधार गृहात केली आहे. सध्या हा अल्पवयीन आरोपी बालसुधार गृहातच आहे. अपघात झाल्यानंतर या मुलाने दारू प्यायली आहे हे सिद्ध होऊ नये म्हणून ससून रुग्णालयात त्याचे ब्लड देखील बदलण्यात आल्याचे समोर आले आहे. यामध्ये ससून मधील दोन डॉक्टर आणि एक शिपाई याला पोलिसांनी अटक देखील केली आहे.

भरधाव वेगाने पोर्श कारच्या धडकेने ज्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. ते युवक युवती अपघात घडला त्या दिवशी दारू पिलेले होते, असा दाखविण्याचा प्रयत्न आता केला जात आहे. त्यासाठी त्यांच्या व्हीसेरात त्यांनी मद्यपान केल्याचे दाखविण्यात येणार आहे, तसा प्रयत्न करण्यात आला आहे, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला.

अपघातमध्ये मृत्यू झालेल्या या दोन्ही तरुण-तरुणी दारू पिले होते. त्यानंतरही ते गाडी चालवत होते हे कोर्टात सिद्ध करायचे. आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याचा अल्पवयीन मुलगा दारू पिला नव्हता हे दाखवायचे, यामुळे कोर्टात ही केस दुय्यम ठरेल, असा प्रयत्न आहे. या सर्वांमध्ये राज्य सरकारचा मोठा हात असल्याचा गंभीर आरोपही देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांनी केलेल्या आरोपामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT