Pune Porsche Accident Sarkarnama
पुणे

Pune Porsche Accident : अल्पवयीन आरोपीची सुटका झाल्यास पोलिस म्हणाले...

Porsche Accident Pune Police to oppose Juvenile Child Release from Remand Home : या दुर्घटनेशी संबधित अल्पवयीन मुलाला 14 दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा गेल्या आठवड्यात या मुलाचा मुक्काम वाढविण्याचा आदेश देण्यात आला होता. ही मुदत बुधवारी संपत आहे.

Chaitanya Machale

Pune News : पुणे पोर्श अपघात प्रकरणी बाल सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या अल्पवयीन आरोपीच्या शिक्षेची मुदत बुधवारी संपणार आहे. त्यामुळे या अल्पवयीन मुलाची सुटका होणार की बाल न्याय मंडळ या मुलाला पुन्हा काही दिवस त्याचा बालसुधारगृहातील मुक्काम वाढविणार याचा निर्णय होणार आहे.

या अल्पवयीन मुलाची सुटका झाल्यास त्याच्या जीवाला धोका असल्याची भीती यापूर्वीच पोलिसांनी व्यक्त केली असून त्याबाबतचे निवेदन बाल न्याय मंडळाकडे देखील दिले आहे.

गेल्या महिन्यात कल्याणीनगर Kalyaniपरिसरात भरधाव वेगाने पोर्श कार चालवून दोन जणांना उडविल्याची घटना घडली होती. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने हा अपघात केला आहे.

मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. ही धडक इतकी भयंकर होती की, दुचाकीवरून जाणाऱ्या दोन अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर चिडलेल्या नागरिकांनी या पोर्श कारमध्ये बसलेल्या अल्पवयीन मुलासह इतरांना बाहेर काढून चांगलाच चोप दिला होता.

ही धडक झाली त्यावेळी हा अल्पवयीन मुलगा कार चालवित असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना (Police) सांगितले होते. त्यानंतर या मुलाला वाचविण्याासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. हा मुलगा मोठ्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असल्याने त्याला वाचविण्यासाठी ससून मध्ये त्याचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले.

याप्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांसह एक शिपाई तसेच या मुलाचे वडील विशाल अगरवाल, आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल, आई शिवानी अगरवाल यांच्यासह ज्या पबमध्ये या मुलाला दारु देण्यात आली. त्याचे मालक, मॅनेजर अशा दहा जणांना अटक केली आहे. हा अपघात झाल्यानंतर या अल्पवयीन आरोपीला 15 तासातच जामीन मंजूर करण्यात आला होता.

हा जामीन मंजूर झाल्यानंतर सोशल मीडियावर (Social-Media) जोरदार चर्चा सुरू झाली होती. इतकेच नव्हे तर पोलिस यंत्रणा आणि न्याय व्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या निकालानंतर आश्चर्य व्यक्त केले होते. त्यानंतर यामध्ये सुधारणा करत संबधित अल्पवयीन मुलाला 14 दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्यानंतर पुन्हा गेल्या आठवड्यात या मुलाचा मुक्काम वाढविण्याचा आदेश देण्यात आला होता. ही मुदत बुधवारी संपत आहे. त्यामुळे या मुलाचा मुक्काम पुन्हा वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार की त्याची सुटका होणार याकडे लक्ष लागले आहे.

या मुलाने केलेल्या कृत्याबद्दल समाजामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. त्यानंतर ससून रूग्णालयात झालेले चुकीचे प्रकार देखील पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या अल्पवयीन मुलाची सुटका झाल्यास संबधित मुलाच्या जीवाला धोका होऊ शकतो, अशी भीती पोलिसांनी यापूर्वीच व्यक्त केली होती.यापार्श्वभूमीवर बाल न्याय मंडळ आज काय निर्णय देणार याकडे पुण्यासह देशातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT