Pune Porsche Car Accident Case : पुण्यातील कल्याणनगर भागात घडलेल्या पोर्श कार अपघात प्रकरणाने, राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. याशिवाय या प्रकरणी दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत.
या घटनेतील अल्पवयीन आरोपीला घटनेनंतर जामीन मंजूर करताना बाल न्याय मंडळाने जी भूमिका घेतली, त्यावर आता चौकशी समितीनेही आक्षेप नोंदवला आहे.
आरोपील मुलाला जामीन मंजूर करताना बाल न्याय मंडळाच्या सदस्यांकडून अनेक चुका राहिल्या असल्याचे अहवालातून म्हटले आहे. एवढच नाहीतर दोन सदस्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली असून, चार ते पाच दवसांत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
महिला व बाल विकास विभागाने नेमलेल्या समितीने यापूर्वीच दोन बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्यांचे जबाब नोंदवले आहेत. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या दोन सदस्यांची चौकशी करण्याचे काम या पाच सदस्यीय पथकाला देण्यात आले होते.
मद्यधुंद अवस्थेत मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने पोर्श कार पळवून दोन तरुणांचा जीव घेणाऱ्या अल्पवीयन आरोपाली बाल न्याय मंडळाने अतिशय सौम्य अटींवर जामीन मंजूर केला होता. त्या अल्पवयीन आरोपीस रस्ता सुरक्षेवर निबंध लिहिण्यास सांगितले गेले होते, हे जेव्हा समोर आले तेव्हा सर्वसामान्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. यामुळे सर्वचस्तरातून पोलीस, प्रशासन आणि सरकारवर टीकाही सुरू झाली होती.
बाल हक्क न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीला 19 मे रोजी जामीन मंजूर केला होता. मात्र हा जामीन मंजूर करताना सादर केलेल्य अहवालात गंभीर चुका आढळल्या होत्या. यामध्ये जामीन मंजूर करण्याचा आदेश एका सदस्याने जारी केला होता तर त्यावर सही दुसऱ्या सदस्याने केली होती. दोन सदस्यांकडून गैरवर्तन आणि नियम मोडले असल्याचे आढळून आले आहे आणि त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.