Pune Porsche Car Accident latest News : पुण्यातील पोर्श 'कार'नामा प्रकरणातील 'त्या' 15 जणांची पोलिसांनी घेतली परेड!

Pune Porsche Car Accident Case : याप्रकरणी आतापर्यंत 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे आणि अल्पवयीन आरोपीला 25 जून पर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Amitesh Kumar pune car accident
Amitesh Kumar pune car accidentSarkarnama
Published on
Updated on

Pune Porsche Accident case Upadate : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा मुक्काम सध्या बालसुधारगृहात आहे. या अल्पवयीन मुलाबरोबर त्या रात्री पार्टी करणाऱ्या 15 मुलांची चौकशी पोलिसांकडून करण्यात आली. त्यामधून तपासाच्या दृष्टीने काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

गेल्या महिन्यात कल्याणीनगर भागात पोर्श कारने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातामध्ये दुचाकी वरून जात असलेल्या दोन अभियंत्यांच्या जागीच मृत्यू झाला होता. यामध्ये एका तरुण तरुणीचा समावेश होता. ज्या कारने हा अपघात झाला ती कार एक 17 वर्षाचा अल्पवयीन मुलगा चालवित होता. प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक विशाल अगरवाल यांचा हा मुलगा आहे.

हा अल्पवयीन मुलगा आपल्या मित्रांबरोबर पब आणि बार मध्ये पार्टी करण्यासाठी गेला होता. तेथे पार्टीमध्ये त्याने भरपूर दारू प्यायली होती. त्याच अवस्थेत त्याने भरधाव वेगात आपली पोर्श गाडी चालवून एका दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीवर पाठीमागे बसलेली तरुणी हवेत उडून रस्त्यावर पडली जागेवरच तिचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालवणारा तरुण गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात त्याचाही मृत्यू झाला.

Amitesh Kumar pune car accident
Pune Porsche Accident : 'त्या' तरुण- तरुणीला मद्यधुंद दाखवण्याचा प्रयत्न अनिल देशमुखांचा खळबळ जनक दावा

हा अपघात गेल्या महिन्यामध्ये 19 मे रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास झाला होता. त्यावेळी गाडीमध्ये असलेल्या या अल्पवयीन आरोपीच्या मित्रांची चौकशी पोलिसांनी केली होती. त्यानंतर आता या अल्पवयीन मुलाबरोबर बार आणि पबमधील पार्टीत सहभागी झालेल्या 15 मुलांची चौकशी देखील पोलिसांनी केली आहे. या प्रकरणात तपासाचा भाग म्हणून या मुलांची चौकशी करण्यात आली.

या पार्टीत सहभागी झालेल्या मुलांनी पार्टीसाठी प्रत्येकी अडीच हजार रुपये जमा केले होते. ही जमा झालेली रक्कम आणि उर्वरित 48 हजारांचे बिल अपघात करणाऱ्या अल्पवयीन मुलानेच दिले, अशी माहिती या मुलांकडून चौकशीत पोलिसांना मिळाली. दरम्यान, या अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला 25 जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश बाल न्याय मंडळाने बुधवारी दिले आहेत.

Amitesh Kumar pune car accident
Pune Porsche Accident Case Accused : ...अखेर अल्पवयीन आरोपीचा बाल सुधारगृहातील मुक्काम 14 दिवसांनी वाढला!

या अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्रयत्न करणारे या मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, आई शिवानी अगरवाल, आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल, तसेच ससूनमधील डाॅ. अजय तावरे, डाॅ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे, यांच्यासह पबमध्ये या मुलांना मद्य विक्री करणारे पबमालक, पब मॅनेजर अशा 10 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com