Tanisha Bhise Family, Eknath Shinde Sarkarnama
पुणे

Tanisha Bhise Death Case : "पैसे नकोत पण..."; तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी शिंदेंच्या शिवसेनेची 5 लाखांची आर्थिक मदत नाकारत केली मोठी मागणी

Deenanath Mangeshkar Hospital Controversy : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची आर्थिक मदत दिली होती. मात्र, ती मदत भिसे कुटुंबियांनी नाकारली. शिंदेंच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे हे भिसे कुटुंबाच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी ही आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला होता.

Jagdish Patil

Pune News, 10 Apr : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशांअभावी वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तनिषा भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाला आहे. या मृत्यू प्रकरणावरून पुण्यासह राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलं असून रुग्णालयातील प्रशासनावर चोहोबाजूंनी टीका केली जात आहे.

तर रुग्णालयाने आपण भिसे कुटुंबियांकडे अनामत रक्कम मागितल्याचे कबूलं केलं. त्यामुळे लोकांचा रुग्णालयाविरोधातील रोष आणखी वाढला आहे. दरम्यान, भिसे कुटुंबियांवर दु:खद प्रसंग ओढावल्यानंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने त्यांना मदतीचा हात पुढे केला.

मात्र, भिसे कुटुंबियांनी ही मदत नाकारली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची आर्थिक मदत दिली होती. मात्र, ती मदत भिसे कुटुंबियांनी नाकारली. शिंदेंच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे हे भिसे कुटुंबाच्या भेटीला गेले होते.

यावेळी त्यांनी पाच लाखांची आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे पैसे भिसे कुटुंबियांनी नाकारले. शिवाय आम्हाला पैसे नकोत पण रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा आणि यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रयत्न करा, अशी विनंती कुटुंबियांनी यावेळी केली.

दरम्यान, याआधी चंद्रकांत पाटील यांच्याकडून भिसे कुटुंबियांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली होती. ती मदत देखील त्यांनी नाकारली होती. आर्थिक मदत नाकारत दिनानाथ रुग्णालयात डॉक्टरांनी राजीनामा दिला असला तरी रुग्णालयातील चुकीच्या लोकांवरती कारवाई करा, चुकीच्या डॉक्टरांवर कारवाई करा, अशी मागणीही भिसे कुटुंबियांनी केली आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT