Shambhuraj Desai Sarakarnama
पुणे

Shambhuraj Desai : शिंदे, फडणवीसांनंतर आता शंभूराज देसाई 'ॲक्शन मोड'वर, 'ते' दोन्ही पब सील!

सरकारनामा ब्यूरो

Pune Hit and Run Case : पुण्यातील कल्याणीनगर भागात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या भीषण रस्ते अपघाताने राज्यभर खळबळ माजवली आहे. विशेष म्हणजे या घटनेतील आरोपी हा अल्पवयीन असून त्याने मद्यपान करत विना क्रमांकाची महागडी कार वर्दळीच्या रस्त्याने प्रचंड वेगाने पळवली होती. ज्यामुळे एक तरुण आणि एका तरुणीला जीव गमावावा लागला. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाहीतर या आरोपीस अवघ्या काही तासांतच जामीनही मिळाला. यामुळे सध्या सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

तर जनभावना लक्षात घेता पोलीस प्रशासन आणि सरकारनेही वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. आरोपीस संभाजीनगरातून पकडे आहे तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीसांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. तर आता राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) सुद्धा कडक भूमिकेत आल्याचे दिसत आहेत. या अल्पवयीन मुलाने ज्या पबमध्ये मद्यपान केले होते, त्याची माहिती समोर आल्यानंतर आता ते कोझी आणि ब्लॅक या नावाचे दोन्ही पब राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सील करण्यात आले आहेत. नियमबाह्य पद्धतीने मद्य विक्री केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, कोझी हॉटेलचे मालक, व्यवस्थापक आणि हॉटेल ‘ब्लॅक’चे मालक यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी हा आदेश केला. 'कोझी’ हॉटेलचे मालक नमन प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन अशोक काटकर आणि हॉटेल ‘ब्लॅक’चे मालक संदीप रमेश सांगळे, असे कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.

अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये मद्य पुरविल्याप्रकरणी दोन्ही हॉटेलमालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध पुणे पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सहायक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तर गृहमंत्री फडणवीसांनी आज पुण्यात पत्रकारपरिषद घेत याप्रकरणी सरकारची आणि पोलिसांची भूमिका जाहीर केली आहे. फडणवीस म्हणाले 'दोन महत्त्वाचे निर्णय पोलिसांनी घेतले. एकतर ज्यांनी अल्पवयीन मुलास दारू दिली. मला असं वाटत की आधीच त्यांच्यावर कारवाई झाली आहे. चार लोकांना अटक करण्यात आली आहे आणि कोर्टाने त्यांना चार दिवसांची कोठडी सुद्धा दिली आहे.

त्यासोबतच त्या मुलासह वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारण कायद्यानुसार आपला मुलगा अल्पवयीन आहे, हे माहिती असून त्याला गाडी देणं हाही गुन्हा आहे त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई केलेली आहे आणि त्यातील पुढील कारवाई सुद्धा लवकरच पोलीस करणार आहेत.

तसेच, मला असं वाटतं की याप्रकरणाला अत्यंत गंभीरतेने पोलिसांनी घेतलेलं आहे आणि मला विश्वास आहे की, अशाप्रकारे दोन लोकांचा अपघातात मृत्यू होवून, सौम्यपणे सोडून देणं. हे काही सहन केलं जाणार नाही, त्यानुसार उचित कारवाई सुरू आहे. त्यामध्ये न्याय हा निश्चितपणे मिळेल. असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT