Pune Accident News : पुण्यातील कल्याणीनगर (Kalyaninagar) भागात भरधाव वेगाने पोर्श कार चालवून अल्पवयीन मुलाने दोघांचा बळी घेतल्याप्रकरणात कोझी हॉटेलचे मालक, व्यवस्थापक आणि हॉटेल ‘ब्लॅक’चे मालक यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी हा आदेश केला.
'कोझी’ हॉटेलचे मालक नमन प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन अशोक काटकर आणि हॉटेल ‘ब्लॅक’चे मालक संदीप रमेश सांगळे, असे कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये मद्य पुरविल्याप्रकरणी दोन्ही हॉटेलमालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध पुणे पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सहायक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पुण्यातील कल्याणीनगर-एअरपोर्ट (Kalyaninagar-Airport) रस्त्यावरील लॅंडमार्क सोसायटीजवळ 19 मे रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास भरधाव आलिशान पोर्श कारने दुचाकीला धडक दिली. यात आयटी अभियंता अनिष अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी अल्पवयीन मुलाविरुद्ध (वय 17 वर्षे आठ महिने) गुन्हा दाखल केला आहे. त्याला रविवारी न्यायालयाने जामीन दिला. दरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्यात अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. Pune hit and run case update
'कोझी' हॉटेलचे मालक, व्यवस्थापक आणि हॉटेल ‘ब्लॅक’चे मालकाला अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये मद्य पुरविल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात पुणे न्यायालयात (Pune Court) हजर केले. सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयात सरकार पक्षातर्फे वकील विद्या विभुते आणि योगेश कदम यांनी युक्तिवाद करत बाजू मांडली. आरोपींच्यावतीने वकील एस. के. जैन यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.