Pune Sakhar Sankul Y Shaped Proposed Bridge Pune Sakhar Sankul Y Shaped Proposed Bridge
पुणे

Sakhar Sankul: साखर संकुल ते जुना पुणे-मुंबई रस्त्यादरम्यान होणारी वाहतूक कोंडी फुटणार! उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा; ७७ कोटींच्या खर्चाला मंजुरी

Sakhar Sankul Bridge: त्यामुळे के. बी. जोशी पथावरून जुना पुणे-मुंबई रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार असून, या परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.

Sudesh Mitkar

Sakhar Sankul Bridge: साखर संकुल ते जुना पुणे-मुंबई रस्त्यादरम्यान उड्डाणपूल अथवा ग्रेड सेपरेटर उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल ७६ कोटी ८० लाख रुपयांच्या खर्चाला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे के. बी. जोशी पथावरून जुना पुणे-मुंबई रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार असून, या परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.

महापालिकेच्या प्रकल्प विभागामार्फत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या कामासाठी सुरुवातीला ७३ कोटी ५१ लाख रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले होते. नोव्हेंबर २०२५ मध्ये तांत्रिक छाननी समितीने त्याला मान्यता दिली होती. त्यानंतर ६१ कोटी ८९ लाख रुपयांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. निविदांची छाननी पूर्ण करून संबंधित कंपनीची निवडही करण्यात आली आहे.

दरम्यान, निविदेतील कामाच्या रकमेसह जीएसटी, रॉयल्टी आणि साहित्य चाचणी शुल्काचा समावेश केल्यानंतर प्रकल्पाचा एकूण खर्च ७६ कोटी ८० लाख ३३ हजार ९३२ रुपये होणार आहे. यामध्ये ११ कोटी ६४ लाख रुपये जीएसटी, ४१ लाख ८२ हजार रुपये रॉयल्टी आणि सहा लाख ६० हजार रुपये साहित्य चाचणी शुल्काचा समावेश आहे. या संपूर्ण खर्चाला तसेच संबंधित कंपनीसोबत करार करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने हिरवा कंदील दिला आहे.

साखर संकुल परिसरातून जुना पुणे-मुंबई रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता हा उड्डाणपूल महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या या मार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल. स्थायी समितीच्या मंजुरीमुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून, आता प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी महापालिकेकडून पुढील प्रक्रिया राबविली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT