Pune crime news  Sarkarnama
पुणे

Pune News: पुण्यात मुलांच्या नव्हे, मुलींच्या टोळीने घातला राडा; नंतर झाली उपरती !

Pune News: भर चौकात घातला शाळकरी मुलींनी राडा

सरकारनामा ब्युरो

Pune News: पुण्यात भर रस्त्यात चित्रपटात शोभेल अशा पध्दतीने चौकात शाळकरी मुलींनी एका मुलीवर हल्ला चढवला. केसांना धरुन ओढत नेत त्यांनी त्या मुलीला मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ त्या मुलींच्या टोळीने समाजमाध्यमावर व्हायरल केला. प्रसिद्ध होण्यासाठी या घटनेचे चित्रिकरण करून "राडा....कंपनी...गँगस्टर.. विषय करायचा नाय ताई" असे व्हिडिओ ला नाव देऊन केला व्हिडीओ व्हायरल. सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात . गेल्या काही वर्षांपासून पुण्याचे रुपडे पालटले असून गुन्हेगारी प्रवृत्ती देखील मोठ्या प्रमाणात डोके वर काढू लागली आहे.

भर रस्त्यात ज्या मुलीला मारहाण करण्यात आली ती मुलगी दिव्यांग होती. घडलेल्या प्रकारानंतर भेदरलेल्या अवस्थेत घरी आलेल्या मुलीला पाहून आई वडिलांना धक्का बसला. घाबरलेल्या मुलीला पाहून आईचेही मन गलबलले. वडीलांनी इन्स्टावर आपल्या मुलीला मारहाण होत असल्याचा व्हीडीओ पाहिल्यावर त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी शाळेत भेट घेवून मुलीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली.या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली.

सोशल मीडियाच्या प्रभावामुळे व्हिडिओ शेयर करून आपली इमेज बनवणे हा त्यांच्या मनातील हेतू होता हे चौकशी दरम्यान उघड झाले. गैरसमजुतीतून या दिव्यांग मुलीला मारहाण केल्याचे या मुलींनी सांगितले. व्हिडिओ शेयर करून आपली इमेज बनवणे हा त्यांच्या मनातील हेतू होता हे उघड झाले आहे.

दरम्यान, मारहाण करणाऱ्या मुलींनी आपली टोळी बनवली होती. एकत्रितपणे विविध ठिकाणांना फिरायला जाणे, वाढदिवस साजरे करणे, मोबाईलवर रील्स बनवणे, समाजमाध्यमांवर फॉलोअर्स वाढवणे हे त्यांचे काम. सोशल मीडियामुळे किशोरवयीन मुलांमध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नवीन गोष्टीं बद्दल निर्माण झालेले आकर्षण. चित्रपटांचे अनुकरण करणे, या गोष्टींमुळे मुलांवर चुकीचे संस्कार होत आहेत.

Edited by- Rashmi Mane

SCROLL FOR NEXT