'Javab do Narendra Modi': एवढे आरोप होऊनही पंतप्रधान शांत का? नाना पटोले आक्रमक

पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यासंदर्भात जम्मू कश्मीरचे माजी राज्यपाल यांनी थेट केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते.
Nana Patole
Nana Patole Sarkarnama
Published on
Updated on

Pune Congress News Update : '' एवढे आरोप होऊनही मोदी गप्प का, असा सवाल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील भाजपवर निशाणा साधला आहे. ते पुण्यात बोलत होते. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यासंदर्भात जम्मू कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी थेट केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांनंतर देशभरात काँग्रेस आक्रमक झाली आहे. (Why is the PM silent despite all these accusations? Aggressive in many way)

केंद्रात २०१४ मध्ये भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून सातत्याने लोकशाहीची पायमल्ली केली जात आहे. जनतेचे रक्षण करण्याची सरकारची जबाबदारी असताना जनतेच्याऐवजी अदानी उद्योगसमूहाला मदत सरकार मदत करत आहे. लोकांना खोटी आश्‍वासने मोदी सत्तेत आले असून, ते सातत्याने देशाला अपमानित करत आहेत. (Maharashtra political news )

Nana Patole
Pimpri Chinchwad News: अखेर अवैध होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी सात तासानंतर गुन्हा दाखल,पोलीस म्हणाले...

मोदी यांनी ५६ इंचांची छाती असल्याचे भासवून देशाला संपविण्याचा प्रयत्न केला आहे. यासह विविध प्रश्‍नांची उत्तरे सरकारने जनतेला देणे अपेक्षित असताना, एवढे आरोप होऊनही मोदी गप्प का, असा सवाल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी (ता.१७) पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला. या प्रश्‍नांची उत्तरे मिळविण्यासाठी कॉंग्रेसच्यावतीने देशभर ‘नरेंद्र मोदी जबाब दो’ आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. (Political news)

कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसच्यावतीने सोमवारी पुण्यातून नरेंद्र मोदी जबाब दो आंदोलनाची सुरवात केली. या आंदोलनाच्या वेळी पटोले पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. ते पुढे म्हणाले, ‘‘कॉंग्रेसच्यावतीने सरकारच्या विरोधात विचारांची लढाई विचारांनी केली तर, आमच्या विरोधात कारवाई केली जाते. देशात जनतेचे पैसे सुरक्षित नाहीत. (Maharashtra Politics)

Nana Patole
Sanjay Shirsat On Ajit Pawar: राष्ट्रवादीत शरद पवारांपेक्षा अजित पवारांची ताकद मोठी; शिरसाटांचं मोठं विधान!

शेतकऱ्यांसाठी काळे कायदे आणण्याचा प्रयत्न या सरकारने केला आहे. या सरकारनं देशाला संपवण्याचा प्रयत्न केला. तरीही हेच देशभक्त आहेत, असा आव आणला जात आहे. भाजपच्याच एका माजी राज्यपालांनी पुलवामा घटनेची हकिगत सांगितली. यावरून मोदी सरकारच्या काळात आपले सैन्य सुद्धा सुरक्षीत नाही. म्हणून आम्ही प्रश्न विचारत आहोत. हे सरकार लोकांना खोट बोलून सत्तेत आलेले आहे. एवढे आरोप होऊनही मोदी गप्प का. संपूर्ण देशाला अपमानित करण्याचं काम मोदींनी केले आहे.’’

‘राज्य सरकारने राजीनामा द्यावा’

अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मानवतेची सेवा केली. त्यांना भारतरत्न मिळायला हवा. अशा व्यक्तींचा जेव्हा सन्मान होतो, तेव्हा इतकी लोक येणं साहजिक आहे. पण इतकी जास्त लोकं येत आहेत, तेव्हा अमित शहा यांच्यासाठी एअर कंडिशन मंडप आणि सामान्य जनता कडक उन्हात कशासाठी. सामान्य जनतेच्या पैशांचा हा कार्यक्रम होता. तरीही जनतेसाठी मंडप का उभारला नाही? असा प्रश्‍न उपस्थित महाराष्ट्रभूषण पुरस्कार वितरण समारंभात उष्माघाताने मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या मृत्यूस सरकारला जबाबदार धरावे आणि राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी जनतेची मागणी आहे. एवढेच नव्हे तर, या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com