Court Verdict Sarkarnama
पुणे

Pune News: गुजरातच्या त्या 'शहा'नं पुणेकराला सव्वा कोटीला गंडवलं अन् कोर्टालाही फसवलं

Pune Sessions Court: 'नलावडेंना पैसे द्यायला तयार आहोत,' असे सांगून त्याने त्याआधारे जामीन मिळवला होता.

Mangesh Mahale

Pune : 'ओएनजीसी कंपनीचे कंत्राट मिळवून देतो,' असे सांगून पुण्यातील व्यक्तीला सव्वा कोटीचा चुना लावणाऱ्या गुजरातमधील व्यक्तीला न्यायालयाने मंजूर केलेला जामीन सत्र न्यायालयाने रद्द केला आहे. त्याला शरण येण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

पुण्यातील व्यावसायिक विक्रम रघुनाथ नलावडे (रा.औंध) यांनी तक्रार केली होती. नलावडे यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. गुजरातमधील धर्मेश प्रफुलचंद्र शहा याला कनिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

सत्र न्यायाधीश व्ही.डी.निंबाळकर यांनी त्याचा जामीन रद्द केला आहे. डिसेंबर 2019 ते डिसेंबर 2022 या दरम्यान एक कोटी 27 लाख 50 हजार रुपये घेऊन ओएनजीसी कंपनीचे कंत्राट मिळवून देतो, असे सांगून नलावडे यांची शहा याने फसवणूक केल्याचे आढळले आहे.

शहा याने बनावट कागदपत्र तयार करून ते खरे आहेत, असे भासवून न्यायालयाची दिशाभूल केली होती. त्याने जामीन मंजूर करून घेतला होता. शहा हा सराईत गुन्हेगार असून देशातील अनेक राज्यात त्याने अनेक लोकांना ओएनजीसी कंपनीचे कंत्राट मिळवून देतो, असे सांगून कोट्यावधी रुपयांना गंडवले आहे. त्याला कनिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. नलावडे यांनी वकील हेमंत झंजाड यांच्या मार्फत कनिष्ठ न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द करण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

कनिष्ठ न्यायालयाने शहा याने न्यायालयात कागदपत्र सादर केली होती. 'नलावडेंना पैसे द्यायला तयार आहोत,' असे सांगून त्याने त्याआधारे जामीन मिळवला होता. पण त्याने पैसेही दिले नाहीत. कनिष्ठ न्यायालयातून जामीन मंजूर झाल्यावर शहा याने नलावडे यांना आपण कोणतेही पैसे देणे लागत नाही, असा उलट युक्तिवाद न्यायालयात केला होता.

याबाबत हेमंत झंजाड यांनी नलावडे यांची बाजू मांडली. त्यांचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य करून शहा याचा जामीन रद्द केला आहे. त्याला न्यायालयापुढे शरण होण्याचे आदेश दिला आहे. शहा याने जामीनासाठी बनावट व्यक्ती आणि कागदपत्रे न्यायालयात सादर केले होते, तपासात हे उघड झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT