Nagar Politics : काळेंना पुन्हा आमदार व्हायचंय..! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या माध्यमातून...

Ashutosh Kale News : काळे आणि कोल्हे यांच्या पारंपरिक संघर्ष आहे.
Radhakrishna Vikhe Pati, Ashutosh Kale
Radhakrishna Vikhe Pati, Ashutosh KaleSarkarnama
Published on
Updated on

Nagar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी २०१९ मध्ये भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा मतांनी पराभव केला होता. काळे आणि कोल्हे यांच्या पारंपरिक संघर्ष आहे. आता अजित पवार गट सरकारमध्ये गेल्याने यांच्या गटात असलेले काळे यांना पुन्हा आमदारकीचे तिकीट हवे आहे. त्यासाठी काळे थेट राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. काळे यांच्या विकास निधीतून झालेल्या कामांचे उद्धघाटन विखेंच्या हस्ते होत आहे.

राज्याचे महसूलमंत्री,नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज (मंगळवार) संपूर्ण दिवसभर कोपरगाव तालुक्याच्या दौऱ्यांवर आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नानातून उपलब्ध झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन तर मंजुरी मिळालेल्या कामांचा प्रारंभ विखे यांच्या हस्ते होणार आहे. काळे यांनी निधी आणला असला तरी या कामांचे उद्घाटन काळे हे विखेंच्या हस्ते करत आपला गड अजून पक्का करून घेत असल्याचे बोलले जात आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आशुतोष काळे आणि भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांच्यात थेट लढत होती. यात आशुतोष काळे यांनी स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या 845 मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे याच मतदारसंघात राधाकृष्ण विखे यांचे मेव्हणे राजेश परजणे यांनी भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली आणि तब्बल 15 हजारावर मते घेतली. कोल्हेंच्या पराभवामागे परजणे यांची बंडखोरी असल्याचे पुढे आले.

Radhakrishna Vikhe Pati, Ashutosh Kale
Maratha Reservation: मराठा आरक्षणात नवा अडथळा ; उद्या सुनावणी

यातून कोल्हे यांनी काढायचा अर्थ तो काढला. या बाबत कोल्हे यांच्याकडून भाजप पक्ष नेतृत्वापुढे तक्रारही करण्यात आल्याचे समजते. दरम्यान यातून विखे-कोल्हे एकाच पक्षात असूनही दुरावल्याचे दिसून आले. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या राहाता तालुक्यातील श्री गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत याचेच पडसाद दिसून आले. युवानेते विवेक कोल्हे यांनी थेट काँग्रेसचे ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात यांना सोबत घेत श्री गणेशची निवडणूक विखे यांच्या पॅनल विरोधात लढली आणि एकहाती जिंकलीही.

विखे विरोधकांवर तोफ डागणार...

यातून संगमनेर-राहाता-कोपरगाव या तीन विधानसभा मतदारसंघात नवा राजकीय संघर्ष सुरू झाल्याचे दिसते. थोरात-कोल्हे विरुद्ध विखे-काळे असा राजकीय संघर्ष सुरू झाल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) मंत्री विखे थेट हेलिकॉप्टरने कोपरगाव तालुक्यात येत असून आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या विविध विकासकामांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहे. यानिमित्ताने एका जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. यात विखे राजकीय विरोधकांवर निश्चित तोफ डागणार असे मानले जात आहे.

Radhakrishna Vikhe Pati, Ashutosh Kale
Drug Mafia Lalit Patil: ललित पाटील प्रकरणात वैद्यकीय अधिकारी डॉ. देवकाते यांना अटक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com