firing news.jpg sarkarnama
पुणे

Pune Firing Case: पुणे हादरलं..! काही सेकंदातच खेळ खल्लास; धाड..धाड..धाड 9 राऊंड फायर,भाजप कार्यकर्त्याला निर्घृणपणे संपवलं

Pune Crime News: काही अज्ञात हल्लेखोरांनी मंगळवारी (ता.28) मावळ येथील देहुरोड येथे पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयाजवळ भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यावर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Deepak Kulkarni

Pune News: पुण्यासह राज्यभरात दिवसेंदिवस गुन्हेगारी फोफावतच चालली आहे. शहरातील वारजे येथे सलूनच्या दुकानात झालेली गोळीबाराची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पुणे हादरलं आहे. देहुरोड येथे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर 9 गोळ्या झाडल्याची माहिती समोर येत आहे.

काही अज्ञात हल्लेखोरांनी मंगळवारी (ता.28) मावळ येथील देहुरोड येथे पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयाजवळ भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यावर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

या हल्ल्यात रमेश रेड्डी हा कार्यकर्ता गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे.त्याला देहूरोड येथील आधार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान रेड्डीचा मृत्यू झाला आहे.

देहुरोड पोलिसांना या गोळीबाराची माहिती मिळताच तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. या गोळीबाराच्या घटनेनंतर दहशतीचं वातावरण निर्माण झाले असून परिसरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,मंगळवारी रात्री झालेल्या अज्ञात हल्लेखोरांनी भाजप कार्यकर्ते असलेल्या रमेश रेड्डी यांच्यावर नऊ राऊंड फायर केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एक गोळी रेड्डींच्या डोक्याला लागली. देहूरोडच्या आधार हॉस्पिटलमध्ये त्यांना जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले होते. मात्र,उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला.पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रेड्डी यांचा मृतदेह पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी हलवण्यात आला.तर पोलिस तपासात रेड्डी याच्यावरील हल्ल्यामागचे कारण समोर येण्याची शक्यता आहे.या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरातील दुकाने बंद करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT