Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
पुणे

स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून पुण्याचं वाटोळं केलं : अजित पवार भाजपवर बरसले

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुण्यात काल रात्री नऊ वाजल्यानंतर सुरु झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजला. विजांच्या कडकडाटसह पडणाऱ्या मुसाळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले. यामुळे रस्ते जलमय झाले होते. रस्ते पाण्याखाली गेले होते. पुणेकरांना पाण्यातून वाट काढत जावे लागले. अनेकांच्या घरात पाणी घुसले. अनेक दुचाकी वाहने पाण्यात वाहत होते. यामुळे मोदी सरकारच्या स्मार्ट सिटी या महत्त्वकांक्षी योजनेवर प्रश्नचिन्ह उमटले आहेत. यावरूनच आता विरोधीपक्षनेते अजित पवार यांनीही भाजपवर टीका केली आहे.

पवार यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं आहे. काल सायंकाळी अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे मनपानं पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते. लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. मनपाला 'अव्यवस्थेची' कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील, असे पवार यांनी म्हंटले.

आणखी एका ट्विट मध्ये पवार म्हणतात, तूर्तास पुण्यातील जनतेला आवश्यक ती सर्व मदत करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा करतंच आहोत. जनतेनं देखील आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन करतो. सर्व प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ती पाऊलं उचलून स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत असून त्याचा आढावा आम्ही घेत आहोत."

दरम्यान, पुढील दिवसात आकाश अंशतः ढगाळ अशी स्थिती आणि दुपारनंतर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणखी दोन दिवस अशी स्थिती कायम राहणार असल्याचे, समजतेआहे. यामुळे पुढील दोन दिवसकामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी पावसाची शक्यता गृहीत धरूनच बाहेर पडावे. रेनकोट - छत्री तर सोबत बाळगावी, पावसाचा अंदाज घेऊनच आपल्या दिनक्रमाचे नियोजन करावे, असे सुचवण्यात आलेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT