Patan : चार ग्रामपंचायतीत बाळासाहेबांच्या शिवसेनेची सत्ता; राष्ट्रवादीची पिछेहाट

पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांचे नेतृत्वाखाली भिलारवाडी, सुतारवाडी व मान्याचीवाडी या ग्रामपंचायती Gram panchyat Unopposed बिनविरोध झाल्या.
Yashraj Desai with wining members
Yashraj Desai with wining memberssarkarnama
Published on
Updated on

सातारा : पाटण तालुक्यातील पाचपैकी चार ग्रामपंचायतींवर राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेची सत्ता आली आहे, असा दावा देसाई यांच्या गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पाटण तालुक्यात राष्ट्रवादीची पिछेहाट सुरू झाल्याचे चित्र आहे.

पाटण तालुक्यातील भिलारवाडी, सुतारवाडी, मान्याचीवाडी, मोरगिरी व घाणव या ग्रामपंचायतींचा निवडणूकीचा कार्यक्रम झाला. यामध्ये राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाखाली भिलारवाडी, सुतारवाडी व मान्याचीवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.

Yashraj Desai with wining members
Karad : उद्धव ठाकरेंनी आमदारांवर गैरविश्वास का दाखवला... शंभूराज देसाईंचा सवाल

निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मोरणा विभागातील मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या मोरगिरी ग्रामपंचायतीत शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील युवा वर्गाने भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूकीला सामोरे गेले होते. सरपंचासह सात उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवार व कार्यकर्ते यांनी दौलतनगर येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई यांची भेट घेतली.

Yashraj Desai with wining members
शंभूराज देसाई भुलथापा मारण्यात पटाईत : सत्यजितसिंह पाटणकर

यावेळी यशराज देसाई यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला. विजयी उमेदवारांचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जिल्हा परिषद सदस्या सौ. सुग्रा खोंदू, बशीर खोंदू, पंचायत समिती सदस्य सौ. निर्मला देसाई, नथूराम कुंभार, गणेश भिसे यांनी अभिनंदन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com