Students appearing for the SSC Class 10 board examination outside a Pune exam center after reports surfaced that the Maths paper was allegedly leaked on a Telegram group before the exam. Sarkarnama
पुणे

Pune SSC Paper Leak : पुण्यात परिक्षेपूर्वीच दहावीच्या 2 प्रश्नपत्रिका टेलिग्राम ग्रुपवर व्हायरल; पेपर फुटीचं सोशल मीडिया रॅकेट उघडकीस आल्याने खळबळ

Class 10 Maths Paper Leak via Telegram : शिक्षण मंडळाने अधिकृत प्रश्नपत्रिकेशी पडताळणी केली असता दोन्ही पेपर बोर्डाचेच असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये पेपर फुटी संदर्भात तक्रार दाखल केली आहे. तर टेलिग्राम ग्रुप अॅडमिन आणि त्या ग्रुपमधील सदस्यांवर गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.

Jagdish Patil

Pune SSC Paper Leak Case : राज्यभरात सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. ही परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. मात्र तरीही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉपीचे प्रकार सुरू असल्याचं उघडकीस येत आहे.

नुकतंच नागपुरातील पेपर फुटीच्या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. अशातच आता विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यात दहावीचा गणिताचे पेपर परीक्षेआधी लीक झाल्याची घटना समोर आली आहे.

तर पेपर फोडण्यासाठी आरोपींनी टेलिग्रामचा वापर केला आहे. ही घटना उघडकीस आल्याने कॉपीमुक्त अभियानाच्या केवळ गप्पा मारल्या जात असल्याची टीका पालकांकडून केली जात आहे. दरम्यान, या पेपरफुटी प्रकरणी पुणे बोर्डाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणिताच्या पेपर आधी गणित भाग-1 आणि भाग-2 चे पेपर एका टेलिग्राम ग्रुपवर पाठवण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे गणित भाग-2 चा पेपर तीन दिवस आधीच टेलिग्राम ग्रुपवर शेअर करण्यात आला होता.

बोर्डाने अधिकृत प्रश्नपत्रिकेशी पडताळणी केली असता दोन्ही पेपर बोर्डाचेच असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये पेपर फुटी संदर्भात तक्रार दाखल केली आहे. तर टेलिग्राम ग्रुप अॅडमिन आणि त्या ग्रुपमधील सदस्यांवर गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.

तर हे पेपर नेमके कुणी फोडले आणि हे रॅकेट नेमकं कधीपासून सुरू आहे. शिवाय याचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत, याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मात्र, हा पेपर फुटीचा प्रकार समोर आल्याने नागरिकांकडून मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT