Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण होणार ‘लखपती’; बिनव्याजी कर्ज मिळणार! जामीनदार, CIBILस्कोअरची अट नाही; संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या!

CM Ladki Bahin Yojana Loan Interest Free Loan Scheme: सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना स्वतःचा छोटा उद्योग, गृहउद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on

Women Loan Scheme Maharashtra : राज्य सरकारची महत्वाची आणि लोकप्रिय असलेली लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींना लखपती करण्याचा विचार फडणवीस सरकार करीत आहे. या योजनेला राज्य सरकारच्या अन्य योजनांसाठी जोडून महिलांना उद्योजिकता बनविण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे.

मुंबईजवळील भाईंदर येथे आयोजित विकसित भारत नारी शक्ती संगम या ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नव्या उपक्रमाची नुकतीच माहिती दिली. ग्रामीण भागातील महिलांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यावर या परिषदेत विशेष भर देण्यात आला.

या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते पण आता राज्य सरकारचा या योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या मानस आहे. महिलांना फक्त आर्थिक मदत देण्याऐवजी त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी महिलांना बिनव्याजी Interest & CIBIL Free Loan for Women कर्ज उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे.

बिनव्याजी कर्ज मिळाल्यानंतर महिलांना व्यवसायाची मोठी संधी निर्माण होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना स्वतःचा छोटा उद्योग, गृहउद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या कर्जासाठी CIBIL स्कोअर किंवा जामीनदाराची अट लागू नसेल, त्यामुळे ग्रामीण आणि मध्यमवर्गीय महिलांनाही आर्थिक मदत सहज मिळू शकते.

Ladki Bahin Yojana
8th Pay Commission: पगारवाढीत पत्नी, मुलांसह आईवडिलांचाही विचार होणार? आठवा वेतन आयोग 'फिटमेंट फॅक्टर'बाबत मोठी अपडेट

कशी करणार परतफेड

  • कर्ज पूर्णपणे बिनव्याजी असणार आहे.

  • महिलांवर अतिरिक्त आर्थिक ताण येणार नाही.

  • साधारणपणे व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर व्याजाचा मोठा बोजा असतो,

  • या Interest & CIBIL Free Loan योजनेत तो पूर्णपणे टाळण्यात आला आहे.

  • कर्ज परतफेडीची पद्धत देखील सोपी ठेवण्यात आली आहे.

  • लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मासिक आर्थिक मदतीतूनच कर्जाचे हप्ते वजा केले जातील.

  • महिलांना वेगळे पैसे जमा करण्याची गरज भासणार नाही आणि कर्जाची परतफेडही नियमितपणे होऊ शकते.

Ladki Bahin Yojana
LPG Gas News: महत्वाची बातमी: देशभरात एस्मा लागू! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत पुन्हा नियम बदलले! नवे नियम काय?

‘उमेद’मधून बाजारपेठ

  • महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी राज्य सरकार ‘उमेद’ उपक्रमाची व्याप्ती वाढवण्याच्या तयारीत आहे.

  • महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हानिहाय उमेद मॉल उभारण्याची योजना आखण्यात येत आहे.

  • या मॉलमध्ये ग्रामीण महिलांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, कपडे, घरगुती उत्पादने आणि इतर विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतील.

  • योग्य ब्रँडिंग आणि मार्केटिंग मिळाल्यास महिला उद्योजिकांचे उत्पादन मोठ्या खासगी कंपन्यांशीही स्पर्धा करू शकते, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

  • महिलांना विविध लघुउद्योग, घरगुती उद्योग किंवा सेवा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज देण्याची योजना तयार करण्यात आली आहे.

  • हे कर्ज महिलांना कोणत्याही प्रकारचा जामीन किंवा हमी न देता दिले जाणार असल्यामुळे अनेक महिलांना याचा थेट फायदा होऊ शकतो.

  • सरकारने या योजनेला केवळ मासिक आर्थिक मदतीपुरती मर्यादित न ठेवता ती इतर महत्त्वाच्या सरकारी योजनांशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

  • महिलांना आर्थिक मदत मिळण्यासोबतच व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com