PMC News: पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी (ता. २३) सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यार पडणार, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
पुणे स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भिमाले यांच्या नावावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. याबाबतचे पत्र चव्हाण यांनी गटनेता गणेश बिडकर यांना पाठवले आहे.
स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी (ता. २३) होत असून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके हे पीठासीन अधिकारी असणार आहेत. स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर शहर सुधारणा समिती, क्रीडा समिती, शिक्षण समिती, महिला बाल कल्याण समिती, नाव समिती, विधी समिती या समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. स्थायी समितीमध्ये एकूण १६ सदस्य आहेत.
त्यापैकी १२ सदस्य भाजपचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि काँग्रेसचा एक सदस्य आहेत. यापूर्वीच भाजपतर्फे श्रीनाथ भिमाले यांचे नाव अध्यपदासाठी निश्चित असल्याचा पदाधिकाऱ्यांकडून दुजोरा दिला होता. नगरसेवकामध्ये भिमाले हे पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांना महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. भिमाले हे माजी गटनेते आहेत.
या निवडणुकीसाठी विरोधीपक्ष उमेदवार देणार की बिनविरोध करणार याकडे लक्ष लागले आहे.स्थायी समिती अध्यक्षपदासाठी इच्छुक नगरसेवकांचे अर्ज हे १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत.
महापालिकेतील स्थायी ही अत्यंत महत्त्वाची समिती आहे. या समितीमध्येच सर्व आर्थिक निर्णय घेतले जातात. त्यामुळे या समितीवर वर्चस्व असणाऱ्यांचा पालिकेत बोलबाला असतो. पालिकेचा कारभार खऱ्या अर्थाने ही समिती चालवित असते. स्थायी समिती सदस्यांचा कालावधी दोन वर्षांचा असतो.
या समितीत वर्णी लागलेल्या सदस्यांना प्रभागात सर्वाधिक निधी मिळत असल्याचे चित्र आहे. पहिल्या स्थायी समितीचे अध्यक्ष झाल्यास अध्यक्षांना दोन वेळा अंदाजपत्रक सादर करण्यास मिळणार आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.