A hostel room in Pune where a student death case emerged, highlighting concerns over academic pressure and student mental health. Sarkarnama
पुणे

Pune Student Death Case : चोरीचा आरोप अन् ॲकॅडमीतून काढण्याच्या धमकी विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, संचालकांसह तिघांवर गुन्हा

Pune Yashotej Academy Probe : अवधूत उल्हास बडे (वय 16, मूळ रा. बीड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मुलाच्या आत्महत्येनंतर त्याच्या वडिलांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तेजस पाटील, विकास पाटील आणि वसंत सरकटे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

Jagdish Patil

Pune News, 20 Apr : पुण्यातील यशोतेज ॲकॅडमीतील एका विद्यार्थ्याने नोव्हेंबर महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रूम पार्टनरचे पैसे चोरल्याच्या आरोपावरून ॲकॅडमीतून काढून टाकण्याची धमकी दिल्यामुळे तो नैराश्यात गेला होता.

याच नैराश्यातून16 वर्षीय विद्यार्थ्याने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान, या विद्यार्थ्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी ‘यशोतेज ॲकॅडमी’च्या संचालकांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

अवधूत उल्हास बडे (वय 16, मूळ रा. बीड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मुलाच्या आत्महत्येनंतर त्याच्या वडिलांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तेजस पद्माकर पाटील (वय 32), विकास सुरेश पाटील (वय 32) आणि वसंत तुकाराम सरकटे (वय 55) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवधूत बडे याने 10 नोव्हेंबर रोजी वसतिगृहात बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेतला. रूम पार्टनरचे 3 हजार रुपये चोरल्याचा त्याच्यावर आरोप होता. या कारणावरून त्याला ॲकॅडमीतून काढून टाकले जाईल, असे वॉर्डन सरकटे याने सांगितले होते.

या घटनेचा तपास केल्यानंतर पोलिसांनी ॲकॅडमीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विद्यार्थ्याचे योग्य समुपदेशन न करता कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT