Shivsena Satara : एकनाथ शिंदेंना मोठा झटका; आमदारानेच फिरवली पाठ, म्हणाले, "फडणवीसांमुळेच शिवसेनेतून लढलो..."

Eknath Shinde Satara Visit : "एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यातील दौऱ्यासाठी आणि कार्यक्रमासाठी बोलावलेच नाही, फोनही आलेला नाही. तर हा शिवसेनेचा हा पहिला कार्यक्रम नाही की ज्याला मी जाणार नाही. साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून माझे फोटो बॅनरवर नसतात, असं म्हणत जिल्ह्यात शिवसैनिक आहेत कुठे?" असा सवालही या आमदाराने उपस्थित केला.
Eknath-shinde
Eknath-shindeSarkarnama
Published on
Updated on

Satara News, 20 Apr : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सातारा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोरेगावचे शिवेसनेचे आमदार महेश शिंदे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. शिवाय त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमासाठी मला बोलावलं नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.

त्यामुळे साताऱ्यात होणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेला आणि संबंधित कार्यक्रमाला आपण जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा साताऱ्यातील अंगापूर येथे नागरी सत्कार होणार आहे. त्यानंतर साताऱ्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावरून ते शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. मात्र, या कार्यक्रमाकडे आमदार शिंदेंनी पाठ फिरवली आहे.

त्यामुळे आता या दौऱ्याच्या निमंत्रणावरून आता शिंदेंच्या सेनेतील वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसत आहे. या दौऱ्याच्या निमंत्रणावरून बोलताना आमदार महेश शिंदे यांनी आता थेट शिवसेना नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शंभूराजे देसाई मला पहिल्यापासून वेगळी वागणूक देतात. ते कोणत्याही कार्यक्रमांना मला बोलावत नाहीत, असा आरोप शिंदे यांनी केला.

शिवाय एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यातील दौऱ्यासाठी आणि कार्यक्रमासाठी बोलावलेच नाही, फोनही आलेला नाही. तर हा शिवसेनेचा हा पहिला कार्यक्रम नाही की ज्याला मी जाणार नाही. साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून माझे फोटो बॅनरवर नसतात, असं म्हणत जिल्ह्यात शिवसैनिक आहेत कुठे, असा सवालही शिंदेंनी उपस्थित केला.

Eknath-shinde
TCS BPO Case : आसिफ म्हणाला, "...म्हणून हिंदू महिलांवर बलात्कार होतो"; पाठीमागून मिठी अन् नको तिथे स्पर्श..., TCS प्रकरणातील पीडितेने सांगितली आपबीती

तर यावेळी आमदार शिंदे यांनी कोरेगावमध्ये शिवसेना आणि भाजपची युती होती. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मला शिवसेनेच्या चिन्हावर लढायला सांगितले, त्यामुळे मी शिवसेनेतून लढलो, असा उल्लेख करत आमदार शिंदेंनी भाजपशी जवळीक साधल्याचं आणि देसाईवर टीका केल्याचं पाहायला मिळालं.

शिवाय यावेळी त्यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर देखील भाष्य केलं. ते म्हणाले, माझी पत्नी शिवसेनेतून निवडून आली आणि भाजपकडून अध्यक्ष झाली नाही. आम्ही पहिल्यापासून भाजपसोबत काम करत आलो आहोत, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Eknath-shinde
Hingoli Case : महाराष्ट्र हादरला! पोलीस कार्यालयातील लिपिकाकडून सतत अनैसर्गिक संबंधांची मागणी, त्रासाला कंटाळून तरुणाने आयुष्य संपवलं

तर पाच वर्ष पालकमंत्रीपद असूनही 30 सदस्यांपर्यंत पोहोचता आलं नाही, असं म्हणत त्यांनी थेट शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा साताऱ्यातील शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यावर काही प्रतिक्रिया देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com