Supriya Sule Sarkarnama
पुणे

Deenanath Mangeshkar Hospital Tax : 48 तासांत मंगेशकर रुग्णालयाचे 27 कोटी वसूल करा; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'नाहीतर मी आंदोलनाला बसेल'

MP Supriya Sule Pune Municipal Corporation Tax Dues Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे महापालिकेच्या थकलेला 27 कोटी रुपयांच्या कर वसुलीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Sudesh Mitkar

Pune Political News : पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उच्चार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाच्या सर्व स्तरातून निषेध होत आहे.

एकीकडे रुग्णालय प्रशासना विरोधात आंदोलन होत असताना दुसरीकडे प्रशासनाबाबतच्या काही बाबी समोर आल्यात. यात प्रामुख्याने महापालिकेच्या थकलेल्या 27 कोटी कराचा मुद्दा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यावर आक्रमक झाल्या आहेत.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने महापालिकेच्या मिळकतकर विभागाची तब्बल 27 कोटींची थकबाकी भरणे बाकी असल्याचे समोर आलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रुग्णालयाने हा कर भरलेला नाही.

ही बाब समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आक्रमक झाल्या असून यावरून त्यांनी महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरलं आहे.

खासदार सुप्रिया सुळे आज पुणे (Pune) दौऱ्यावर असून त्यांच्याकडून बारामती लोकसभा मतदारसंघातील महापालिकेच्या निगडित विविध प्रश्नांसंदर्भात बैठक घेण्यात आली. महापालिकेत त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी मतदार संघातील विकास कामांचा आढावा घेतला.

शहराच्या लगतच्या उपनगरांमध्ये रस्ते पाणी कचरा यासारख्या मूलभूत प्रश्नांबाबत त्यांनी आढावा घेत प्रशासनाला याबाबत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. तसेच मंगेशकर हॉस्पिटल चा प्रॉपर्टी टॅक्स किती थकीत आहे याची माहिती सुप्रिया सुळे यांनी घेतली.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, सामान्य लोकांनी टॅक्स भरला नाही तर त्यांच्या घरापुढे तुम्ही बँड वाजवता मात्र या संस्थेने इतक्या कोटींचा कर थकवला असताना महापालिका प्रशासन कोणतीच ठोस का भूमिका घेत नाही.

सामान्य लोकांसाठी एक न्याय आणि अशा या संस्थेला दुसरा न्याय का? लावता. असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. तसेच पुणे महानगरपालिकेने मंगेशकर हॉस्पिटल संदर्भात प्रॉपर्टी टॅक्स बाबत 48 तासात काही निर्णय केला नाही तर महानगरपालिका मध्ये मी आंदोलन करणार असल्याचा देखील सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT