Dattatray Gade arrest 
पुणे

Dattatray Gade arrest :...अन् त्या एका चुकीमुळे रात्रभर शेतात लपलेला दत्ता गाडे पोलिसांच्या जाळ्यात अडकला!

Swaragate accused arrested : पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शिरुर तालुक्यातील गुणाट गावातून आरोपीला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बलात्कार केल्यानंतर आरोपी थेट याच गावात गेल्याची माहिती समोर आली आहे.

Jagdish Patil

Pune News, 28 Feb : पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला (Dattatray Gade) अखेर पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शिरुर तालुक्यातील गुणाट गावातून आरोपीला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बलात्कार केल्यानंतर आरोपी थेट याच गावात गेल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपी दत्तात्रय गाडे हा गावातील शेतात लपून बसला होता. यावेळी तो नातेवाईकाच्या घरी गेल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र, सतत सुरू असणाऱ्या बातम्या आणि या घटनेच्या चर्चेमुळे गावची बदनामी होत असल्यामुळे अखेर गावकऱ्यांनी देखील आरोपीला पकडून देण्यासाठी मदत केली आणि अखेर गावकरी आणि पोलिसांच्या प्रयत्नाना यश आलं.

शेतात लपून बसलेल्या दत्तात्रय गाडेला गावकऱ्यांनी बाहेर येण्यासाठी आवाहन केलं होतं. बलात्कारच्या कृत्याने गावची बदनामी होत असल्याचं गावऱ्यांनी त्याला सांगितल्यानंतर त्याला अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

नेमकी अटक कशी केली?

स्वारगेट येथे बलात्काराचे (Swaragate rape case) कृत्य केल्यानंतर दत्तात्रय गाडे गुणाट (ता.शिरुर) गावातील शेतातील कॅनॉलमध्ये लपला होता. यावेळी त्याने त्याचा मोबाईल बंद केला. मात्र, पोलिसांनी मोबाईल स्ट्रेस करत त्याचं शेवटचे लोकेशन शोधलं आणि श्वानपथक, ड्रोन अन् गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी (Police) गुणाट तेथे येऊन आरोपीचा शोध घ्यायला सुरूवात केली.

यावेळी काही लोकांनी तो उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, गुरूवारी दिवसभर तो पोलिसांना सापडला नाही. मात्र, गुरुवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास तहान लागल्याने तो एका घरात पाणी पिण्यासाठी गेला. ज्या घरात तो पाणी पिण्यासाठी गेला होता त्या महिलेने फोन करून पोलिसांना आरोपीबाबतची माहिती दिली.

त्यानंतर बलात्कारच्या कृत्याने गावची बदनामी होत असल्याने ग्रामस्थांनी आरोपीसोबत संवाद साधला आणि त्याला शरण येण्याची विनंती केल्यानंतर तो शरण आला. त्यानुसार रात्री दीड वाजता पोलिसांना त्याला अटक केली. सध्या त्याला लष्कर पोलिसांत नेण्यात आलं आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून शुक्रवारी त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT