Mahayuti News : विधिमंडळ सदस्य नियुक्तीत भाजपची आघाडी तर मित्रपक्षांच्या वाट्याला अद्याप प्रतीक्षाच!

BJP legislative appointments News : विधीमंडळाच्या एकूण 29 समित्या आहेत, त्यातील महायुतीच्या फाॅर्म्युल्यानुसार भाजपने त्यांच्या वाट्याला आलेल्या 11 समित्याची नेमणूक करत आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडील नियुक्त्या रखडल्या आहेत.
Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार येऊन दोन महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी झाला. मात्र, विधिमंडळाचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य सरकारकडून 29 समित्या गठीत केल्या जातात. मात्र, या समित्यावरील नियुक्त्या गेल्या काही दिवसापासून रखडल्या होत्या. मात्र. या समित्या नियुक्तीला आता मुहूर्त लागला आहे. विधीमंडळाच्या एकूण 29 समित्या आहेत, त्यातील महायुतीच्या फाॅर्म्युल्यानुसार भाजपने त्यांच्या वाट्याला आलेल्या 11 समित्याची नेमणूक करत आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडील नियुक्त्या रखडल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र विधीमंडळाच्या सन 2024-2025 या कार्यकाळासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजप विधीमंडळ मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांच्या संमतीने या समित्यांची नियुक्ती करण्यात आली. अशातच भाजपच्या नेतृत्वाखाली नवे नियुक्त सदस्यांची नियुक्ती करीत भाजपने आघाडी घेतली असली तरी महायुतीमधील मित्रपक्षाने विविध समित्यांची नियुक्ती केलीली नाही.

Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Uddhav Thackeray : 'कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर जोरदार पलटवार

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढच्या महिन्यात होणार आहे. 10 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले असतानाच विधिमंडळाचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य सरकारकडून 29 समित्या गठीत केल्या जातात. मात्र, या समित्यावरील नियुक्त्या गेल्या काही दिवसापासून रखडल्या आहेत. त्यामध्ये सर्वपक्षीय आमदाराचा समावेश असतो. मात्र, सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून या समितीसाठी आमदारांची यादीच पाठविण्यात आली नसल्याने या नियुक्त्या रखडल्या होत्या.

Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Sharad Pawar News : शरद पवारांच्या जवळच्या दोन बड्या नेत्यांना फडणवीस सरकारकडून मोठं गिफ्ट?

महाराष्ट्र विधिमंडळाच्या समित्यांची घोषणा भाजपने (Bjp) दोन दिवसापूर्वी करीत आघाडी घेतली आहे. भाजपच्या 11 समित्यांवर नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील समित्यांचे वाटप अद्याप झाले नसल्याचे पुढे आले आहे. मित्रपक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या वाट्याला आलेल्या समित्यांवर नव्या सदस्यांची नियुक्ती अद्याप केलीली नाही.

Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Mahayuti News : महायुतीत माने-आवाडेंची दिलजमाई होईना; श्रेयवादाचे राजकारण कुणाच्या अंगाशी येणार?

विधानसभा अध्यक्षांनी विविध समित्यांच्या संदर्भात नव्या नियुक्त्या सर्व पक्षीयांकडून होत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. तर मंत्रिपद हुकलेल्या भाजप आमदारांचे समितीच्या मार्फत राजकीय पुनर्वसन केले जाणार आहे. सोबतच ज्येष्ठतेनुसार समित्यांचे वाटप करण्यात येणार होते. पुढे आलेल्या माहितीनुसार, भाजपच्या वाट्याला 11 समित्या, तर शिवसेनेच्या वाट्याला 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला 5 समित्यांच्या सदस्यांची नियुक्ती होणार असल्याचे समजते. तर उर्वरित सात समित्या विरोधी पक्षाच्या वाट्याला आल्या आहेत.

Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Kolhapur protest : कोरटकरांना अटक करा; अन्यथा मुख्यमंत्र्यांना सहा मार्चला कोल्हापुरात आडवू

सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी आमदार राहुल कुल यांची तर पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे-पाटील यांची वर्णी लागली आहे. तर आश्वासन समितीच्या अध्यक्ष पदावर रवी राणा यांची, तर अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्ष पदी नारायण कुचे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Shivsena UBT : ठाकरे गटाला भगदाड पडणं सुरूच! दापोलीच्या उपनगराध्यक्षासह चिपळूणच्या माजी नगरसेवकाचा जय महाराष्ट्र

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्यापही विधिमंडळ समितींबाबत घोषणा झालेली नाही. तर दोन्ही पक्षांकडून समितींबाबत घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधिमंडळाच्या या कामकाज समित्यावरील सदस्यांची नियुक्ती जवळजवळ दोन महिन्यांपासून रखडली होती. सत्ताधारी व विरोधी पक्षाने या समित्यांवर कोणाची नियुक्ती केली जावी, याबाबत शिफारस केलेली नाही, त्यामुळे या समिती गठीत करण्यास विलंब होत आहे. भाजपने त्यांच्या वाट्याला आलेल्या 11 समित्यांवर नव्या सदस्यांची नियुक्ती करीत आघाडी घेतली आहे.

Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Yogesh Kadam : योगेश कदमांचे आव्हान ठाकरेंची शिवसेना पेलणार? कसं राखणार मंडणगड?

विधीमंडळाच्या एकूण 29 समित्या असतात, त्यातील महायुतीच्या फाॅर्म्युल्यानुसार भाजपच्या वाट्याला आलेल्या 11 समित्या आल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेने त्यांच्या वाट्याला आलेल्या सहा तर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या वाट्याला आलेल्या सहा सदस्यांची अद्यापही विधिमंडळ समितींबाबत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून त्यांच्या वाट्याला आलेल्या सदस्यांची नियक्ती कधी केली जाणार याची उत्सुकता लागली आहे. दोन्ही पक्षाकडे मोठ्या प्रमाणात इच्छुक या पदासाठी आहेत. त्यामुळे या पदासाठी जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Pune Crime : पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा; हॉटेल मालकावर पेट्रोल ओतले तो पळाला म्हणून त्याची गाडी जाळली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com