Dattatray Gade rape case Sarkarnama
पुणे

Dattatray Gade rape case : दत्तात्रय गाडे थंड डोक्याचा गुन्हेगार, युवतीवरील अत्याचारानंतर कीर्तनाला लावली हजेरी...

Dattatray Gade rape case Pune swargate bus stand kirtan Gunat village : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात युवतीवर अत्याचार केल्यानंतर दत्तात्रय गाडे गावी शिरूरमधील गुनाट गावी येत कीर्तनाला हजेरी लावली होती.

Pradeep Pendhare

Pune Swaragate bus stand crime : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात युवती अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे हा थंड डोक्याचा गुन्हेगार असल्याचे समोर येत आहे.

युवतीवर अत्याचार गेल्यानंतर दत्तात्रय गाडे बसने गुनाट (ता. शिरूर) गावी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी काल्याच्या कीर्तनात सहभागी झाला. दुपारी गावात पोलिस येताच त्याने पळ काढला, असा घटनाक्रम समोर आला आहे.

पुणे (Pune) पोलिसांनी घटना घडल्यापासून त्याच्या मागावर होते. दोन दिवसांपासून दत्तात्रय गाडे लपून बसला होता. कधी ऊसाच्या शेतात, त्यानंतर कॅनाॅलमध्ये लपून राहिला. शेवटी तो त्याला भूक असाह्य झाली. तहान लागली. त्यातून तो बाहेर आला नातेवाईकांकडे गेला. भूक, पाणी, पश्चाताप, असे सांगत सरेंडर व्हायचे आहे, असे म्हणू लागला. त्याचवेळी नातेवाईकांनी पोलिसांना फोन करून त्याची माहिती दिली.

पुणे स्वारगेट इथं दत्तात्रय गाडे याने मंगळवारी मध्यरात्रीनंतर गुन्हा केला. त्यानंतर तो बुधवारी उघडकीस आला. गुरूवारी दिवसभर दत्तात्रय गाडे याचा शोध पोलिसांनी (Police) सुरू केला. जवळपास वेगवेगळ्या पथकातून 250 पोलिस त्याच्या मागावर होते. आज शुक्रवारी पहाटे त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी देखील केली आहे. त्याला थोड्याच वेळात न्यायालयात हजर केले जाणार आहे.

काल्याच्या कीर्तनाला हजेरी...

दत्तात्रय गाडे हा थंड डोक्याचा गुन्हेगार असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. गुन्हा गेल्यानंतर तो आरामात बसने गुनाट (ता. शिरूर) गावी आला. निर्लज्जपणाचा कळस म्हणजे, त्याने सकाळी गावात सुरू असलेल्या काल्याच्या कीर्तनाला हजेरी लावली. त्याची ही पद्धत म्हणजे, एका सराईत थंडगार गुन्हेगारासारखी ठरते. दुपारनंतर घटनेचे गांभीर्य वाढले. वृत्तवाहिन्यांवर बातम्या समोर येऊ लागल्या.

गुन्ह्यानंतर दत्तात्रय गाडे होता सावध

दत्तात्रय गाडे यानंतर सावध झाला, तो गावातील हालचालींवर लक्ष ठेवून होता. गावात पोलिस येताच, त्याने घरातून पळ काढला. घरातील छतावरून उडी घेऊन तो आजूबाजूच्या ऊसाच्या शेतात घुसला. याच दरम्यान त्याने आपला मोबाईल बंद केला. त्यामुळे पोलिसांना त्याचे लोकेशन सापडत नव्हते.

ड्रोन अन् डॉग स्क्वॉडची मदत...

दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पुणे पोलिसांची 13 पथके कार्यरत होती. यात गुनाट परिसरात मोठ्याप्रमाणात ऊसाची शेती आहे. तो तिथं लपून बसला असेल, म्हणून ड्रोनच्या मदतीने तिथं शोध घेण्यात आला. डॉग स्क्वॉडकडून संपूर्ण शेती पिंजून काढली. यानंतर जीवाचे बरे वाईट करेल म्हणून परिसरातील विहिरींची तपासणी करण्यात आली. याचवेळी दत्तात्रय गाडे याची वरिष्ठ पोलिस कुंडली काढली. दत्तात्रय गाडे हा थंड डोक्याचा व्यक्ती असल्याचे समोर आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT