Swargate Rape case Sarkarnama
पुणे

Swargate Rape Case: स्वारगेट अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट; आरोपी दत्ता गाडेबाबत 'ही' धक्कादायक माहिती समोर

Datta Gade News : स्वारगेट अत्याचार प्रकरणात सातत्यानं धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. 25 फेब्रुवारीला स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका फलटणला निघालेल्या तरुणीवर अत्याचार करण्यात आले होते.यामुळे पुणे शहर हादरलं होतं.

Deepak Kulkarni

Pune News : पुणे शहरातील वर्दळीचं ठिकाण असलेल्या स्वारगेट बसस्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली होती. यामुळे महिलांची सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. आता याच प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेबाबत (Datta Gade) सायबर पोलिसांच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेनं एका वर्षात एक दोन नव्हे तर तब्बल 22 हजार अश्लील व्हिडीओ पाहिल्याची धक्कादायक बाब समोर त्याच्या गुगल हिस्ट्रीमधून समोर आली आहे. तपासादरम्यान,सायबर पोलिसांनी गाडेच्या मोबाईल फोनमधील गुगल सर्च हिस्ट्री तपासली. यावेळी ही बाब समोर आली आहे.

स्वारगेट अत्याचार प्रकरणात (Pune Rape Case) सातत्यानं धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. 25 फेब्रुवारीला स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका फलटणला निघालेल्या तरुणीवर अत्याचार करण्यात आले होते. शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रिहवासी असलेल्या दत्तात्रय गाडेनं तरुणीवर दोनवेळा बलात्कार केल्याचं तपासात समोर आलं आहे. स्वारगेट येथील घटनेनंतर पुणेच नव्हे तर सगळा महाराष्ट्र हादरला होता.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. महत्त्वाची बाब म्हणजे यापूर्वी आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांनी या प्रकरणात धक्कादायक विधान करतानाच दोघांमध्ये संगनमतानं शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याचा दावा केला होता. मात्र,पैशांमुळे व्यवहार फिसकटला असल्याची माहिती त्यांनी आरोपी गाडेनं दिले असल्याचं सांगितलं होतं.

स्वारेगटमध्ये तरुणीवर पहाटेच्या सुमारास अत्याचार केल्यानंतर आरोपी दत्ता गाडेनं त्याच्या गुनाट गावी धूम ठोकली होती.तसेच तो त्यानंतर तो गावातील एका धार्मिक कार्यातही सहभागी झाला होता. पण टीव्हीवर बातम्या येऊ लागल्यानं गाडे तिथून पसार झाला. यानंतर पुणे पोलिसांनी गुनाट गावच्या ग्रामस्थांसह तीन ड्रोन कॅमेरे, श्वान पथकांच्या मदतीनं गाडेला अटक केली होती.

पुणे शहरातील मध्यवर्ती स्वारगेट एसटी स्थानकात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दत्तात्रय खाडेला पोलिसांनी पकडले होते. या घटनेच्या तब्बल 70 तासानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. त्याच्या अटकेनंतर त्याने तीनवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहितीही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली होती.

आरोपी दत्ता गाडे येरवडा कारागृहात असून त्याच्याविरोधात पुणे पोलिसांनी एकून 823 पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रामध्ये पोलिसांनी एकूण 82 साक्षीदार तपासून पाच साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदवल्याचं नमूद केलं आहे. पोलिसांनी आरोपी गाडे गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी हजर असल्याचा दावा करणारे भक्कम पुरावे असल्याचा दावाही केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT