Traffic resumes two-way movement at Acharya Anand Rishiji Chowk near Savitribai Phule Pune University after completion of the double-decker flyover and metro corridor work. Sarkarnama
पुणे

Pune Traffic News : पुणेकरांना दिलासा! विद्यापीठासमोरील आचार्य आनंदऋषीजी चौकातील वाहतुकीत मोठा बदल; ट्रॅफिकचा ताण कमी होणार

Ganeshkhind Baner Pashan Road : गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौकात दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर बाणेर, पाषाण आणि अभिमानश्री सोसायटी मार्गावरील एकेरी वाहतूक रद्द करून दुहेरी वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

अनिल सावळे

Pune News : पुणे गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. पाषाण, बाणेर आणि अभिमानश्री सोसायटी रस्त्यावर लागू करण्यात आलेली एकेरी वाहतूक रद्द करून या मार्गांवर दुहेरी वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

चतु:शृंगी वाहतूक विभागांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील परिसरात मेट्रो मार्गिका आणि दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू होते. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पाषाण रस्ता, बाणेर रस्ता आणि अभिमानश्री सोसायटी परिसरात एकेरी वाहतूक करण्यात आली होती.

या बदलांमुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत होता. हे काम पूर्ण झाल्याने गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील पूर्वीचे निर्बंध हटवले आहेत.

आचार्य आनंदऋषीजी चौक ते अभिमानश्री सोसायटी ते बाणेर रस्त्यावरील वाहतूक पुन्हा दुहेरी केली आहे. पाषाणकडून अभिमानश्री सोसायटीमार्गे आचार्य आनंदऋषीजी चौकापर्यंतची वाहतूकही दोन्ही बाजूंनी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय अभिमानश्री सोसायटीतून पाषाण आणि बाणेरकडे जाणारा रस्ताही दुहेरी करण्यात आला आहे.

तसेच, बाणेर फाट्याकडून येणाऱ्या आणि अभिमानश्री सोसायटीकडून पाषाणकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी सकाळनगर परिसरातून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. त्यामुळे या मार्गावरील दैनंदिन वाहतुकीचा ताण काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT