Pune Mahapalika News : लेले, पुरोहितांसह स्वीकृतसाठी भाजपकडून निष्ठावंतांना संधी : 400 इच्छुकांमधून 7 नावं फायनल; पराभूतांचा पत्ता कट

PMC Nominated Corporator News: पुणे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी भाजपकडून 400 इच्छुकांमधून सात जणांची नावे जाहीर झाली आहेत.
Pune BJP
Pune BJP Sarkarnama
Published on
Updated on

Pune Mahapalika News : पुण्यात महानगरपालिका निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक नियुक्तीची प्रक्रिया सुरू होताच इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. यात सत्ताधारी भाजपकडून स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी तब्बल ४०० जण इच्छुक असल्याचा समोर आलं होतं. या ४०० नावांतून ७ नावं निवडण्याचं मोठं काम स्थानिक नेत्यांवर होतं, त्यानुसार नावे निश्चित करण्यात आली आहेत.

महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ५ (२) नुसार स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्याची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार सभागृहात निवडून आलेल्या राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार संबंधित गटनेत्यांशी चर्चा करून स्वीकृत सदस्यांची नावे निश्चित केली जातात. त्यानंतर पक्षांकडून शिफारस करण्यात आलेल्या नावांवर आयुक्त महापौर आणि इतर गटनेत्यांशी चर्चा करून अंतिम प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवतात. सभागृहाला एखादे नाव फेटाळण्याचा अधिकार असला तरी त्यामागील कारणे नमूद करणे आवश्यक असते

Pune BJP
NCP Leader Arrested: राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक; तरुणीवर लैंगिक अत्याचार, पक्ष कारवाई करणार का?

या पदावर संधी मिळावी यासाठी इच्छुकांकडून पक्षनेत्यांकडेही जोरदार पाठपुरावा सुरू होता. सभागृहातील संख्याबळानुसार यंदा भाजपला ७, राष्ट्रवादी काँग्रेसला २ आणि काँग्रेसला १ असे एकूण १० स्वीकृत नगरसेवक पदे मिळणार आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.

Pune BJP
UPSC Success Story: बाप शेतकरी, पोरगं झालं ‘क्लास वन’ अधिकारी! शिकवणी न लावता असं केलं अभ्यासाचं नियोजन

महापालिकेकडून आज ११ ते दुपारी २ या वेळेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी अधिकृत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे संबंधित पक्ष उमेदवारांची नावे अंतिम करण्यात आली असून भाजपकडून या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

नावे पुढीलप्रमाणे

  1. राजेंद्र काकडे

  2. उदय लेले

  3. विश्वास ननवरे

  4. प्रियांका शेंडगे

  5. रविंद्र साळेगावकर

  6. जयप्रकाश पुरोहित

  7. निलेश कोंढाळकर

राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्याकडूनही नावे जाहीर

  • माझी महापौर दत्तात्रय धनकवडे आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी राकेश कामठे यांना संधी

  • काँग्रेसने एका जागेवर कामगार नेते सुनील शिंदे यांना संधी दिली आहे.

भाजपकडून निष्ठावंतांना संधी :

निलेश कोंढाळकर, राजेंद्र काकडे या दोघांना महापालिका निवडणुकीत पक्षाने एबी फॉर्म दिलेला होता. पण ऐनवेळी या दोघांची उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांना आता स्वीकृत नगरसेवक पदावर संधी देण्यात आलेली आहे. उदय लेले, पुरोहित, शेंडगे, ननावरे हे पक्षाचे जुने कार्यकर्ते असून ते देखील महापालिकेसाठी इच्छुक होते. पण त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नव्हती. अशा जुन्या निष्ठांचा कार्यकर्त्यांना भाजपने यावेळी संधी दिलेली आहे.

धनकवडे पुन्हा सभागृहात :

राष्ट्रवादी काँग्रेसने संधी दिलेले दत्ता धनकवडे हे यापूर्वी पुणे महापालिकेचे महापौर होते. 2026 च्या निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक 38 मधून निवडणूक लढली होती. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर पक्षाने त्यांना पुन्हा एकदा स्वीकृत नगरसेवक या माध्यमातून महानगरपालिकेत येण्याची संधी दिली आहे.

काँग्रेसकडे स्वीकृत नगरसेवक पद अशी एक जागा आहे त्यासाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब आहे. काँग्रेसने स्वीकृत नगरसेवक पदासाठी नाव निश्चित करण्यासाठी 64 जणांच्या मुलाखती घेतल्या. त्यामध्ये माजी नगरसेवक व अन्य अन्य मात्र मंडळीचा समावेश होता मात्र कामगार क्षेत्रात गेल्या 30 वर्षापासून कार्यरत असणाऱ्या शिंदे यांना काँग्रेसने संधी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com