Pune Univercity
Pune Univercity Sarkarnama
पुणे

Pune University : पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीत भाजप-महाविकास आघाडीत होणार थेट लढत!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : विद्यापीठातील निवडणुका या मुख्य धारेतील राजकारणापासून अलिप्त असावे, असा एक सर्वसाधरण संकेत आहे. मात्र आता सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकांमध्ये मुख्य धारेतील 'राजकारणाचा' प्रवेश होणार आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी राजकारणात महाविकास आघा़डीच्या नव्या प्रयोगाला आकार आले आहे. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येऊन, सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलची घोषणा करत, दहा जणांची उमेदवारी जाहीर केली आहे.

याआधीच भाजप पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच पॅनेलकडून दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता विद्यापीठाच्या आवारात मुख्य धारेतील राजकीय पक्षांचा प्रवेश झाला आहे. विद्यापीठात आता भाजप आणि महाविकास आघाडी थेट लढत पाहायला मिळणार आहे. मात्र अशा प्रकारच्या राजकारणामुळे विद्यापीठातील वातावरण आणि विद्यार्थी राजकारणात भरडले जाईल? या निवडणुका होताना ते निकोप आणि लोकशाही मूल्यांना प्रमाण मानून पार पडतील का? असा प्रश्न अनेकांकडून केला जात आहे.

यावर राष्ट्रवादीचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रीया दिला आहे. विद्यापीठावर काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची सत्ता आहे. विद्यापीठात राजकारण नको, असे आम्हालाही वाटतं, विद्यापीठातील मागील अनेक वर्षांपासून विद्यापीठातील भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभाराला विरोध व्हायला हवा, असे जगताप म्हणाले.

येत्या २० नोव्हेंबरला पदवीधर गटाची निवडणुकीसाठी पुणे, नाशिक, नगर या ठिकाणी मतदान पार पडणार आहे. तर २२ नोव्हेंबरला पुणे विद्यापीठात मतमोजणी होऊन, निकाल जाहीर होणार आहे.

विद्यापीठाच्या आवारात आता थेट राजकाऱण होणार असल्याने, उघडपणे राजकीय पक्षांचा प्रवेश विद्यापीठात होत असल्याने याचा थेट परिणाम विद्यापीठीय व्यवस्थेवर होणार का? विद्यार्थी थेट राजकारणात सक्रिय होऊन विद्यापीठाच्या वातावरणात मुख्य धारेतील राजकीय पक्षांचा चंचुप्रवेश होत असल्याने अनेकांडून याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विद्यापीठीय वातावरण राजकारण आणि राजकीय पक्षांपासून अलिप्त असावे, या संकेताला तडा गेल्याची भावना अनेकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT