Pune University Student Controversy  Sarkarnama
पुणे

Pune University Student Controversy : पुणे विद्यापीठात भाजप अन् डाव्या विद्यार्थी संघटनांमध्ये तुफान राडा; पोलिसांनी वातावरण...

Chetan Zadpe

Pune University Student Controversy News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वसतिगृहाच्या भिंतीवर पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याने विद्यापीठ परिसरात आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भारतीय जनता पार्टीची विद्यार्थी संघटना असणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांमध्ये तुफान राडा घडून आला. दोन्ही संघटनांमध्ये घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे विद्यापीठ परिसरात वातावरण तणावाचे बनले होते. (Latest MarathI News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपचे पदाधिकारी राघवेंद्र मानकर म्हणाले, "पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह पेंटिंग काढण्यात आलं होतं. यावर आम्ही शांततेत निषेध व्यक्त करत होतो. ही लाल बावट्याची ढेकणं, आमच्या आंदोलनाच्यामध्ये येऊन बसले, त्यांना आम्ही पुढच्यावेळी ठेचल्याशिवाय राहणार नाही," असा खुला इशारा त्यांनी दिला.

डाव्या संघटनांचा आरोप होता की, आंदोलन करताना त्यांचा झेंडा तुम्ही जाळला, पायाखाली तुडवला, यावर अभाविपचे पदाधिकारी राघवेंद्र मानकर म्हणाले, 'देशाच्या पंतप्रधानांबद्दल तुम्ही काहीही लिहिलं तर चालतं. कसली तुमची संघटना? झेंडा जाळला तर तुम्हाला एवढा त्रास होतो का?" दोन विद्यार्थी संघटनांमध्ये राडा झाल्याने या ठिकाणी मोठा फौजफाटा दाखल झाला. पोलिसांनी या वेळी परिस्थिती नियंत्रणात आणून, परिस्थिती आटोक्यात आणली.

काय आहे नेमकं प्रकरण?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ८ क्रमांकाच्या वसतिगृहाच्या आवारात पार्किंगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिला गेला असे अभाविपचा आरोप आहे. हा प्रकार काल रात्री उशिरा लक्षात आला. यानंतर विद्यापीठाचे सुरक्षारक्षक तिथे पोहोचले. त्यांनी संपूर्ण परिसर मोकळा केला आणि तिथे जाण्यास आता कुणालाही परवानगी नाही. सुरक्षारक्षक तिथे तैनात करण्यात आले आहेत.

आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करण्यात येत आहे. या परिसरात काल कोण-कोण गेलं? आणि कोणी हा मजकूर लिहिला? याचा शोध घेतला जात आहे तसेच चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांविरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

पुणे विद्यापीठ घटनेचे नांदेडमध्ये प्रतिसाद -

पुणे विद्यापीठात एसएफआयच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये एसएफआयच्या वतीने निदर्शने करण्यात आलीय. नांदेड शहरातील आयटीआय चौकात हे निदर्शनं करण्यात आले. पुणे येथील विद्यापीठात एसएफआयच्या कार्यकर्त्यांवर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप या वेळी करण्यात आलाय. अभाविपच्या कार्यकर्त्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी एसएफआयच्या वतीने करण्यात आलीय.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT