Voice of Devendra Sarkarnama
पुणे

Voice of Devendra Contest : 'रोहित पवारांचं कसं आहे, आपला तो बाब्या..'; टीम देवेंद्रने 'रयत'च्या स्पर्धांवर ठेवलं बोट

Pune University Voice of Devendra Criticism Fadnavis Team Responds with Rayat Competition Details : पुणे विद्यापीठाच्या 'व्हॉईस ऑफ देवेंद्र' स्पर्धेवर आमदार रोहित पवारांनी टीका करताच, टीम देवेंद्रने रयत शिक्षण संस्थांतील स्पर्धांचा इतिहास मांडला.

Pradeep Pendhare

Voice of Devendra : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी 'व्हॉईस ऑफ देवेंद्र' नावानं नवा स्पर्धात्मक उपक्रम सुरू केला होता.

या उपक्रमावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस तथा आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेत, विद्यापीठावर चांगलीच आगपाखड केली होती. आमदार पवारांच्या आक्षेपानं महाराष्ट्रातील 'टीम देवेंद्र' चांगली दुखवली आहे. टीम देवेंद्रनं आमदार पवार यांनी जशास-तसं उत्तर दिलं आहे.

'आमदार रोहित पवारांचे (Rohit Pawar) वर्तन म्हणजे, आपला तो बाब्या दुसऱ्यांचे ते कारटं, असा टोला लगावत रयत शिक्षण संस्थेत पवारांवर निबंध स्पर्धा ठेवताना राजकीय अजेंडा राबवतोय याची लाज वाटली नाही का?' असा प्रश्न 'टीम देवेंद्र'ने विचारला आहे.

'शरद पवारांनी रयत संस्था बळकावली आणि इतकंच नव्हे, तर संस्थेच्या कॉलेजमध्ये पवारांचे गोडवे गाणारे विषय घेऊन स्पर्धा आयोजित केल्या जातात, याचा विसर रोहित पवारला पडलेला दिसतोय!', असेही टीम देवेंद्रने समाज माध्यमांवर म्हटलं आहे.

पुणे (Pune) द्यापीठाने 'व्हॉईस ऑफ देवेंद्र' उपक्रमासाठी परिपत्रक काढलं होतं. तसंच रयत शिक्षण संस्थेमध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धांचे परिश्रम समाज माध्यमांवर टीम देवेंद्रने शेअर केल्या आहेत. रोहित पवारांनी 'व्हॉईस ऑफ देवेंद्र' स्पर्धेवरून टीका करताना, 'चार बोटं स्वतःकडे आहे, याचे भान ठेवावं', असा सल्ला देखील दिला आहे.

'व्हॉईस ऑफ देवेंद्र' उपक्रमासाठी परिपत्रकावरून पुणे विद्यापीठात वादंग झाला. NSUI आणि इतर विद्यार्थी संघटनांनं आंदोलन केलं. यानंतर पुणे विद्यापीठानं 'Voice of Devendra' परिपत्रक मागे घेतलं आहे. परंतु विद्यार्थी संघटनेनं विद्यापीठाकडून राजकीय व्यक्तीपूजा सुरू आहे, असा विषय घेतलाच का? याबाबत स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.

याशिवाय 'व्हॉईस ऑफ देवेंद्र' उपक्रम नागपूरमध्ये घेण्याचं नियोजन सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु याबाबत कुठूनही दुजोरा मिळाला नाही. पुणे विद्यापीठामध्ये निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर नागपूर इथं या उपक्रमाचं कसं नियोजन होतं, याकडे आता लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT