Vaishnavi Hagawane Death Case Sarkarnama
पुणे

Vaishnavi Hagawane Case : हगवणे कुटुंबियांचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघडकीस, चक्क पोलिसांना फसवणं आलं अंगलट

Hagawane Brothers Arms License Fraud: पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप हगवणे कुटुंबियांवर करण्यात आला असून याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच आता सुनेला त्रास देणं, हुंड्यासाठी तिचा छळ करणं या कारणांमुळे अटकेत असलेल्या हगवणे भावांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.

Jagdish Patil

Pune News, 30 May: पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप हगवणे कुटुंबियांवर करण्यात आला असून याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशातच आता सुनेला त्रास देणं, हुंड्यासाठी तिचा छळ करणं या कारणांमुळे अटकेत असलेल्या हगवणे भावांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांचं आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे.

तो म्हणजे या दोघांनी शस्त्र परवाना मिळवण्यासाठी चक्क पोलिसांना खोटी माहिती दिल्याची बाब समोर आली आहे. या दोघांच्या पिस्तूल परवाण्याची चौकशी पुणे पोलिसांकडून सुरू असताना ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शशांक आणि सुशील हगवणे या दोघांनी चुकीचा पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळवल्याचं समजताच शशांक विरोधात वारजे आणि सुशीलच्या विरोधात कोथरुड पोलिस स्टेसनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हगवणे कुटुंबियांनी केलेल्या विविध कांडामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

हगवणे कुटुंब पुणे ग्रामीण मधील पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतात. त्यांनी 2022 साली पुणे ग्रामीण पोलिसांकडे बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. मात्र हा अर्ज पुणे ग्रामीण पोलीसांनी फेटाळले. त्यानंतर परवाना मिळवण्यासाठी शशांक आणि सुशील हगवणे दोघांनी ते पुणे शहरात रहात असल्याचे खोटे पत्ते तयार केले.

शशांकने वारजेला तर सुशीलने कोथरुडमध्ये रहात असल्याचा खोटा पत्ता तयार केला आणि पुणे पोलीसांकडून शस्त्र परवाना मिळवून पिस्तुल खरेदी केली. शस्त्र परवाना मिळवण्यासाठी हगवणे बंधूंनी पुण्यातील रहिवाशी असल्याचा खोटा पत्ता दिल्याचं उघडकीस आल्यानंतर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिणामी हगवणे बंधुंचा या निमित्याने आणखीन एक कारणामा उघड झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT