Raj Thackray
Raj Thackray Sarkarnama
पुणे

Raj Thackeray म्हणाले, "बाळासाहेबांची माझं ते भाषण ऐकलं अन् सांगितलं..मैदानाची भाषा.."

सरकारनामा ब्युरो

MNS chief Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज 'व्हिजेटीआयटी'च्या विद्यार्थ्यांसाठी दिलखुलासपणे संवाद साधला. बालपण, महाविद्यालयीन जीवन, मराठी भाषा, करिअर आदी विषयावर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना राज ठाकरेंनी उत्तरे दिली.

"आपला वारसा काय आहे ते समजून घ्या, नुसते हार घालून उपयोग नाही.छत्रपती शिवाजी महाराज यांना नीट समजून घ्या मी शिवभक्त नव्हे, मी शिववेडा आहे," असे राज ठाकरे म्हणाले. आपल्या पहिल्या भाषणांची आठवण यावेळी राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांशी शेअर केली.

राज ठाकरे म्हणाले, "आजही मला भाषण देताना टेन्शन येतं, भाषणाच्या दिवशी हात थंड पडतात. कारण मी काय बोलणार हे मला माहित नसते. भाषणाच्या वेळी मी काही मुद्दे काढतो, पण ते बाजूला ठेवून माझे भाषण होते. मला ठरवून भाषण करता येत नाही, मनातून जे वाटतं ते बोलतो,"

भाषण ऐकण्यासाठी माँ आली होती..

"१९९१ मध्ये माझे एका ठिकाणी भाषण होते. माझे ते भाषण ऐकण्यासाठी माँ (मीनाताई ठाकरे) आली होती. त्यानंतर ती मला बाळासाहेबांकडे घेऊन गेली. बाळासाहेबांनी माझे ते भाषण घरी ऐकले होते. भाषणाच्या ठिकाणी स्पीकरवरुन एका फोनच्या माध्यमातून त्यांनी भाषण ऐकलं होते,"असे राज म्हणाले.

ते कसे शहाणे होतील हे सांगा..

"ज्या मैदानावर भाषण असेल त्या मैदानाची भाषा बोलावी, आपण कसे शहाणे आहोत, हे सांगण्यापेक्षा ते कसे शहाणे होतील हे सांगावे, असा सल्ला बाळासाहेबांनी दिला," असे राज ठाकरे यांनी सांगितले.

जाती-पातीमध्ये खिचपत पडू नका

"जाती-पातीच्या भानगडीत पडू नका, मैत्री करता जात पाहू नका, जातीमुळे तुमच्या हाती काहीही लागणार नाही, आपण मराठी, हिंदू आहोत हे लक्षात ठेवा.जातीपातीमुळे विचका होतो.जाती-पातीमध्ये खिचपत पडू नका," असा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT