Ajit Pawar Sharad Pawar Pune ZP Sarkarnama
पुणे

Pune ZP Election : धक्कादायक पराभवानंतर अजित पवारांनी ZP साठी प्लॅन बदलला; शरद पवार, काँग्रेस देणार साथ!

Ajit Pawar Sharad Pawar Congress : महापालिकांमध्ये मिळालेल्या अपयशामुळे अजित पवारांनी जिल्हा परिषदेसाठी रणनीती बदलली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे जिल्हा हा गेली काही दशक राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अजूनही पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये वर्चस्व असल्याचं दाखवून दिलं होतं. बहुतांश ठिकाणी अजित पवार यांच्या पक्षाचे नगराध्यक्ष निवडून आले होते. मात्र, महापालिका निवडणुकांमध्ये त्यांना मोठा झटका बसला.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांमध्ये दादांनी जोरदार टक्कर दिली मात्र अपेक्षित असं यश काय त्यांना मिळालं नाही. त्यामुळे हा पराभव मागे टाकून आता अजित पवार यांनी पुणे जिल्हा परिषदेतची सत्ता राखण्यासाठी कंबर कसली आहे.

या निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसला स्वबळावर निवडणूक लढवावी लागणार आहे. तर दुसरीकडे भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील एकत्र येण्याबाबत चर्चा करत आहे. नुकतीच या दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक देखील झाली.

भाजप शिवसेनेच्या युतीशी अजित पवार दोन हात करण्यासाठी तयार असून निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला एक संघ ठेवून काँग्रेसलाही सोबत घेण्याचा विचार अजित पवारांकडून सुरू करण्यात आला असल्याचं सांगितले जात आहे.

महानगरपालिका निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांमध्ये मत विभाजन झालं आणि त्याचा फायदा कुठेतरी भाजपाला झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये हे विभाजन टाळून भाजपाशी दोन हात करण्यात संदर्भात रणनीती आखली जात आहे.

काँग्रेससोबत येणार?

जिल्हा परिषद निवडणुका संदर्भात अजित पवारांकडून जिल्ह्यातील नेत्यांसोबत आज बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीमध्ये अजित पवार या सर्व जिल्ह्यातील नेत्यांचं मत जाणून घेणार आहेत. तसेच कशा पद्धतीने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांची मोड बांधून ही निवडणूक जिंकता येईल या संदर्भात चर्चा करणार आहेत.

विजयी उमेदवारांना भेटणार

पुण्यामधील बैठकीनंतर अजित पवार पुणे महापालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांना भेटण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. पवार सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार देखील करणार असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT