Dhule BJP Leader Attack : महापालिका निवडणुकीचे पडसाद; भाजप नेत्याच्या घरावर असंतुष्टांचा सशस्त्र हल्ला!

Dhule Municipal Election Fallout : शहरातील प्रभाग क्रमांक 12 येथून माजी महापौर प्रदीप कर्पे यांचे चिरंजीव प्रतीक कर्पे विजयी झालेत. निवडणूक निकालानंतर अरुण चौधरी हे कर्पे यांचे समर्थक शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. नवनिर्वाचित नगरसेवक कर्पे आणि चौधरी यांच्यात चर्चा सुरू होती.
Dhule Municipal corporation  Election
Dhule Municipal corporation ElectionSarkarnama
Published on
Updated on

Dhule News, 18 Jan : महापालिका निवडणुकीच्या निकालाचे पडसाद उमटू लागले आहेत. अनेक ठिकाणी प्रतिस्पर्धी आणि नवनिर्वाचित यांच्यात वाद होत आहेत. धुळे शहरात देखील त्याचे तीव्र पडसाद उमटले. धुळे महापालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केली आहे. या पक्षाला 50 जागा मिळाले आहेत.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि आमदार अनुप अग्रवाल यांचे नियोजन येथे यशस्वी झाले. माजी महापौर प्रदीप कर्पे यांच्या घरावर जमावाने सशस्त्र हल्ला केला. भारतीय जनता पक्षातील दोन गटांमध्ये वादातून हा हल्ला झाला. या हल्ल्यामुळे महापालिका निवडणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक 12 येथून माजी महापौर प्रदीप कर्पे यांचे चिरंजीव प्रतीक कर्पे विजयी झालेत. निवडणूक निकालानंतर अरुण चौधरी हे कर्पे यांचे समर्थक शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. नवनिर्वाचित नगरसेवक कर्पे आणि चौधरी यांच्यात चर्चा सुरू होती.

Dhule Municipal corporation  Election
Jalgaon Municipal Election : महापालिकेतील भाजपच्या 100 टक्के स्ट्राईक रेटचे रहस्य अखेर उलगडलं...

यावेळी एक जमाव अचानक कर्पे यांच्या घरावर चालून आला. यामध्ये पंकज धात्रक, बॉबी मनोज धात्रक, सोनू सरक, कन्हैया थोरात, दीपक शिंदे, मोहिनी धात्रक, अमोल गवांदे आदींनी शिवीगाळ करत घरावर दगडफेक सुरू केली. सुनीता कर्पे या घराबाहेर आले असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली.

यावेळी जमावातील काहींनी तुम्ही प्रतिस्पर्धी कार्यकर्त्यांशी संपर्क का ठेवता. त्या कार्यकर्त्यांमुळे पक्षांमध्ये वाद होत असतो. निवडणुकीत तुम्हाला कोणी मदत केली हे माहीत नाही का? अशी विचारणा करत सशस्त्र हल्ला केला. नवनिर्वाचित नगरसेवक प्रतीक करपे ज्या प्रभागातून निवडून आले आहेत तेथे पंकज धात्रक आणि बॉबी मनोज धात्रक हे इच्छुक होते.

Dhule Municipal corporation  Election
Raj K Purohit Passes Away : मुंबई भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष राज पुरोहित यांचं निधन, मुलाच्या विजयानंतर दोनच दिवसांनी घेतला अखेरचा श्वास

भारतीय जनता पक्षाने मात्र कर्पे यांना उमेदवारी दिली. या रागातून हा हल्ला झाल्याचे बोलले जाते. माजी महापौराच्या घरावर निवडणूक निकालानंतर झालेल्या हल्ल्याने शहरात एकच खळबळ उडाली. संदर्भात आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शस्त्र हल्ला करणे आणि दरोडा असा गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com