Pune ZP Election Result Sarkarnama
पुणे

Pune ZP Result : पुण्यात राष्ट्रवादीच ‘दादा’; विरोधकांना चारळी धूळ, पुन्हा एकहाती सत्ता काबीज

Ajit Pawar Pune rural politics news : आतापर्यंतच्या निकालामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला ३९ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला आहे.

Rajanand More

NCP wins Pune ZP : पुण्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालावर अजित पवार यांच्या निधनाचे सावट दिसून आले. निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच अजितदादांचे अपघाती निधन झाले अन् बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रावर दु;खाचा डोंगर कोसळला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निकालात अजितदादांच्या राष्ट्रवादीला किती जागांवर यश मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर निकाल हाती आल्यानंतर पुण्यात राष्ट्रवादीच दादा असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण ७३ जागांसाठी मतदान झाले होते. त्यापैकी आतापर्यंत ५५ जागांचे निकाल जाहीर झाले असून राष्ट्रवादीने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेत पुन्हा राष्ट्रवादीच सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आतापर्यंतच्या निकालामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला ३९ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला आहे. प्रमुख विरोधक असलेल्या भाजपला केवळ ८ तर शिवसेनेला चार जागा मिळाल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही तीन जागा मिळाल्या आहे. काँग्रेसला मात्र आतापर्यंत भोपळा फोडता आलेला नाही. अद्याप १८ जागांचे निकाल जाहीर व्हायचे आहेत.

बारामतीतील जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादीचे सर्व उमेदवारांचा विजय निश्चित झाला आहे. तर मावळ, दौंड, इंदापूर या तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीने आपली ताकद दाखवून दिली आहे. बहुतेक जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.

विजयाचा उत्साह नाही

राष्ट्रवादीने पुन्हा सत्ता काबीज केली असली तरीही कुठेही विजयाचा उत्साह दिसत नाही. अजित पवार यांच्या निधनामुळे या विजयावर दु:खाचे सावट आहे. त्यामुळे काही अपवाद वगळता मतमोजणी केंद्रावर विजयाच्या घोषणा, गुलालाची उधळण दिसून आली नाही. काही विजयी उमेदवारांना निकालानंतर अश्रू अनावर झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT