Political leaders and candidates during nomination filing amid large-scale party defections before Pune Zilla Parishad and Panchayat Samiti elections. Sarkarnama
पुणे

Pune ZP Election : पुण्यात जिल्हा परिषदेसाठी पक्षांतराचा महापूर : एका दिवसात 11 तालुक्यांमध्ये तब्बल 40 जणांनी बदलले पक्ष

Pune Zilla Parishad Election : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी 11 तालुक्यांत 40 नेत्यांनी पक्ष बदलल्याने राजकीय समीकरणे बदलली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठी उलथापालथ दिसत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pune ZP Election Politics : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. उमेदवारीच्या गणितात अनेक ठिकाणी मोठे ट्विस्ट बघायला मिळत आहे. उमेदवारी नाकारल्याने निर्माण झालेल्या नाराजीचे रूपांतर थेट पक्षांतरामध्ये होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सर्वच पक्षांतून दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश झाले आहेत. आता उमेदवारी अर्ज माघारीनंतर खरी लढत स्पष्ट होणार आहे.

भोर

  • वेळू पंचायत समिती गणात भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने अशोक वाडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत थेट उमेदवारी अर्ज दाखल केला.

  • कामथडी- भोंगवली जिल्हा परिषद गटात भाजपकडे मुलासाठी उमेदवारी मागूनही नकार मिळाल्याने के. डी. सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेशानंतर त्यांचा मुलगा महादेव सोनवणे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली.

राजगड

  • मनसेचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संतोष दसवडकर यांचे बंधू अंकुश दसवडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

  • राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने जिल्हा बँकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर व त्यांचे पुत्र व माजी उपसभापती अनंता दारवटकर यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला.

  • राष्ट्रवादीच्या माजी सभापती संगीता प्रकाश जेधे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मुळशी

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रामदास गोळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

  • राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष प्रशांत रानवडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यांच्या पत्नी पायल रानवडे यांना माण गणातून उमेदवारी मिळाली.

पुरंदर

  • शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरिभाऊ लोळे यांचा भाजपमध्ये प्रवेश; वीर-भिवडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी

  • काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत गेलेले माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे यांना पुन्हा काँग्रेसची उमेदवारी

  • बेलसर-माळशिरस गटातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कैलास इंगळे यांचा भाजपमध्ये प्रवेश. त्यांचा मुलगा अजय इंगळे यांना भाजपकडून उमेदवारी.

इंदापूर

  • राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील-ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी

  • पंचायत समितीचे माजी सभापती नंदकुमार सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

  • लुमेवाडी गणात हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते शिवाजी मोहिते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज

  • निमगाव केतकी येथील गोरख आदलिंग यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून भाजपमध्ये प्रवेश

  • ॲड. सचिन राऊत यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश

दौंड

  • राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश; खडकी-देऊळगाव गटातून उमेदवारी

  • पाटस गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी सभापती आशा शितोळे यांचे पती नितीन शितोळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

शिरूर

  • टाकळी हाजी गटातील राजेंद्र गावडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश

  • रांजणगाव सांडस गटाच्या माजी सदस्या रेखा मंगलदास बांदल यांचा लोकशाही क्रांती आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

  • निमगाव म्हाळुंगी येथील माजी सरपंच हनुमंत काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष सोडून ऐनवेळी भाजपची रांजणगाव सांडस पंचायत समिती गणातून उमेदवारी स्वीकारली.

  • राहुल रणदिवे यांना रांजणगाव सांडस पंचायत समिती गणातून शिवसेनेची उमेदवारी

  • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सारिका करपे यांना तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस गटातून शिवसेनेची उमेदवारी

  • भाजपचे विजय रणसिंग यांना रांजणगाव सांडस पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी

  • राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील सुजाता पवार यांना मांडवगण फराटा-वडगाव रासाई गटातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी

हवेली

  • पेरणे- लोणीकंद गटात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलेले प्रदीप भाऊ कंद यांनी उमेदवारी अर्ज भरला.

  • सोरतापवाडी गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार संजय उर्फ काका महादेव कुंजीर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळाली.

  • कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगावचे माजी सरपंच सुरज भालचंद्र चौधरी यांना भाजपची उमेदवारी जाहीर.

जुन्नर

  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुका प्रमुख मंगेश काकडे यांनी शिवसेनेत प्रवेश करून आळे- पिंपळवंडी जिल्हा परिषद गटाकडून उमेदवारी मिळवली.

  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख माउली खंडागळे, माजी जिल्हा परिषद सदस्य मंगेश काकडे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. खंडागळे यांच्या पत्नीला बोरी गटातून, तर काकडे यांना पिंपळवंडी गटातून उमेदवारी मिळाली आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका युवती अध्यक्ष अक्षदा मांडे-पानसरे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना ओतूर- धालेवाडी गटातून जिल्हा परिषदेची शिवसेनेने उमेदवारी दिली आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरपंच अजिंक्य घोलप यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या पत्नी नीलम घोलप यांना शिवसेनेची पंचायत समिती तांबे गणातून उमेदवारी दिली आहे.

  • भाजपचे मंडल अध्यक्ष महेंद्र सदाकाळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पत्नी रेश्‍मा यांनी शिवसेनेकडून डिंगोरे गणातून उमेदवारी अर्ज भरला आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे बुधाजी शिंगाडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पत्नी अनिता शिंगाडे यांना शिवसेनेची उदापूर गणातून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

आंबेगाव

  • माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत प्रवेश

  • शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण थोरात पाटील यांच्या पत्नीचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज

खेड

  • भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

  • खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह मोहिते यांचा शिवसेनेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या नीलिमा गणेश थिगळे यांनी रेटवडी- वाफगाव गटात उमेदवारी नाकारल्यामुळे शिवसेने प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केला.

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयसिंग भोगाडे यांच्या सुनबाई दीप्ती जयसिंग भोगाडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करून रेटवडी- वाफगाव गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT