Pune ZP Election: आत्मविश्वास की अहंकार..? ना अजितदादा,ना शिंदे..; भाजपचं कोणाशीच जुळेना, पुणे ZP मध्ये शिवसेनेसोबत फाटलं

Pune Zilla Parishad Elections : जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली दोन्ही पक्ष स्वाबळावर निवडणूक लढवणार, त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
BJP and Shiv Sena (Shinde faction) leaders during election preparations in Pune as alliance talks collapse ahead of Zilla Parishad and Panchayat Samiti elections.
BJP and Shiv Sena (Shinde faction) leaders during election preparations in Pune as alliance talks collapse ahead of Zilla Parishad and Panchayat Samiti elections.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : भाजपने महापालिका निवडणुका दरम्यान सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेणार नसल्याचं जाहीर केलं होतं. पण याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला सोबत घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर चर्चेची अनेक गुऱ्हाळ झाली. मात्र, सरतेशेवटी शिंदे आणि भाजपमध्ये काही जुळलंच नाही. असंच चित्र पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्तानं पाहायला मिळालं आहे.

पुणे जिल्ह्यातील सध्या जिल्हा परिषदेच्या 196 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 360 जागांसाठी निवडणूक होत आहे. बुधवारी(ता.21) या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसापर्यंत भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये युतीच्या वाटाघाट्या सुरू होत्या.

मात्र, ज्या पद्धतीने पुणे महापालिका निवडणुकीत अखेरच्या क्षणी भाजपा आणि शिंदेच्या सेनेमधील युती तुटली त्याच पद्धतीने जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये देखील युती तुटली असून आता स्वबळावर निवडणुका लढणार असल्याचं जाहीर करण्यात आला आहे.

त्यामुळे महापालिका निवडणुकीप्रमाणे पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील महायुतीतील तीन मित्र पक्ष वेगवेगळे निवडणूक रिंगणामध्ये उतरणार असल्याच आता स्पष्ट झाला आहे.

पालिका निवडणुकीमध्ये भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी युती करण्यास नाकार दिला होता. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कसल्याही प्रकारच्या युतीच्या अपेक्षा न ठेवता अजित पवारांनी सुरुवातीपासूनच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये अजित पवारांनी आपले उमेदवार दिले आहेत.

BJP and Shiv Sena (Shinde faction) leaders during election preparations in Pune as alliance talks collapse ahead of Zilla Parishad and Panchayat Samiti elections.
Pune ZP Election: पुणे,पिंपरी चिंचवड महापालिकेनंतर आता भाजपचा जिल्हा परिषदेतही डाव; अजितदादांना धक्क्यावर धक्का

गेले 25 वर्ष पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता राहिलेली आहे. त्यामुळे महापालिकेतली सत्ता गेली तरी जिल्हा परिषद मधील सत्ता कशाही पद्धतीने राखायची हा चंग अजित पवार यांनी बांधला असून त्यानुसार यंत्रणा कामाला लावली आहे. तर दुसरीकडे पुणे महापालिकेमध्ये भाजपची मोठी ताकद असली तरी जिल्ह्यामध्ये त्यांची ताकद मर्यादित आहे.

BJP and Shiv Sena (Shinde faction) leaders during election preparations in Pune as alliance talks collapse ahead of Zilla Parishad and Panchayat Samiti elections.
Pune ZP elections : दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटलांचं एकत्र येणं इच्छुकांना रुचेना, संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये नाराजीचं वातावरण, पक्षाने एक डाव राखून ठेवला

मागील काही काळामध्ये संग्राम थोपटे, संजय जगताप या सारख्या नेत्यांना पक्षांमध्ये प्रवेश घेऊ भाजपने जिल्ह्यामध्ये आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याला मर्यादा आहेत. तर एका शिंदे यांचे देखील जिल्ह्यामध्ये दोन आमदार आहेत विजय शिवतारे यांच्यासारख्या आमदारांच्या ताकतीच्या जीवावर शिंदे देखील या निवडणुकीत मोठी लढत देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महायुतीतील मित्र पक्षांमधील होणाऱ्या या लढती केले सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com