Pune Zilla Parishad & Panchayat Samiti Results: मावळमधील पाचही जिल्हा परिषद आणि दहाही पंचायत समितीच्या जागा राष्ट्रवादीने ताब्यात घेतल्या आहेत. अनेक जागा थेट भाजपकडून खेचून आणत राष्ट्रवादीने भाजपला धोबीपछाड दिला आहे. मावळात आव्वाज राष्ट्रवादीचा, असा संदेश या निकालाने दिला आहे.
अजितदादांचे कट्टर समर्थक सुनील शेळके यांनी भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांना धूळ चारली आहे. मावळ तालुक्यात झेडपी–पंचायत समितीच्या १५ जागांवर राष्ट्रवादीचा दणदणीत विजय मिळवत भाजपाचा सुपडा साफ केला आहे. आमदार सुनील शेळके या विजयाचे 'शिल्पकार' आहेत, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
मावळ पंचायत समितीवर २५ वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता होती. भाजपचा हा अभेद गड राष्ट्रवादीने ताब्यात घेतला आहे. या निवडणुकीत भाजपाला एकही जागा जिंकता आलेली नाही. भाजपचा हा पराभव म्हणजे बाळा भेगडे यांच्या पुढील राजकीय वाटचालीचा मैलाचा दगड ठरला आहे.
"अजितदादा असते तर आम्ही आज विजयोत्सव साजरा केला असता, अशा कठीण परिस्थितीत मावळच्या मायबाप जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली. अजित पवार यांनी मावळच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी दिला, त्या कामांनाही सुरुवात झाली. आजचा निकाल म्हणजे अजित पवार जनतेने अजित पवार यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करणे आहे, असे सुनील शेळके यांनी म्हटले, हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
जिल्हा परिषद
टाकवे बुद्रुक–नाणे गट
मधुकर कोकाटे – 7,279
अशोक दाते – 721
अनंता पावशे – 21,207 (विजयी)
नोटा – 631
इंदुरी–वराळे गट
पल्लवी दाभाडे – 14,831 (विजयी)
मेघा भागवत – 14,222
नोटा – 203
खडकाळे–कार्ला गट
आशाताई वायकर – 11,658
दीपाली हुलावळे – 17,693 (विजयी)
नोटा – 478
कुसगांव बुद्रुक–काले गट
दत्तात्रय गुंड – 11,747
भगवान डफळ – 1,518
संतोष राऊत – 17,402 (विजयी)
धीरज गरवड – 179
नोटा – 242
सोमाटणे–चांदखेड गट
शितल गराडे – 10,980
मनिषा मुऱ्हे – 23,505 (विजयी)
नोटा – 470
निकाल – पंचायत समिती
टाकवे बुद्रुक :
प्राची गायकवाड – 11,681 (विजयी)
नाणे : आशा मोरमारे – 10,057 (विजयी)
वराळे : राजेंद्र कडलक – 9,656 (विजयी)
इंदुरी : दिलीप ढोरे – 7,073 (विजयी)
खडकाळे : समीर जाधव – 9,059 (विजयी)
कार्ला : रेश्मा देवकर – 7,234 (विजयी)
कुसगांव बुद्रुक : योगेश लोहर – 7,287 (विजयी)
काले : शैला कालेकर – 10,264 (विजयी)
सोमाटणे : साहेबराव कारके – 9,218 (विजयी)
चांदखेड : सुनिता येवले – 10,569 (विजयी)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.