Pune Zilla Parishad Winner List Sarkarnama
पुणे

Pune ZP : पुणे ZP अध्यक्ष निवडीत ट्विस्ट : सुनेत्रा पवार 'महिला' नेत्यासाठी आग्रही; ताकद दाखवण्यासाठी पुरुष नेते लागले कामाला

Pune Zilla Parishad President & Vice President Election: पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी इच्छुकांकडून समर्थक नेत्यांकडे जोरदार लॉबिंग सुरू असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणुकीसाठी अवघे काही तास राहिले असताना अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्ष पदाचा उमेदवार ठरलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ७३ पैकी ५१ सदस्य आहेत. पदाधिकारी निवडीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या बैठकीत सर्वाधिकार देण्यात आले. असे असताना देखील काही इच्छुक आणि त्यांच्या समर्थक नेत्यांकडून काही शक्कल लढवून लॉबिंग केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा परिषदेतील गटनेता निवडीसाठी काही दिवसांपूर्वी जिल्हा बँकेच्या सभागृहात बैठक झाली होती. या बैठकीमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांना देण्याचा ठराव करण्यात आला. त्यामुळे त्यांच्याकडून जी नावे येतील, ते सदस्य अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होतील, असे ठरले आहे.

अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी १८ मार्च रोजी होत आहे. त्या दिवशी सकाळी नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेऊन त्यामध्ये नावे घोषित केली जाणार आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष त्याचबरोबर उपाध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. त्या प्रामुख्याने दौंड मधील तीन टर्म जिल्हा परिषदेत असलेले वीरधवल जगदाळे, बारामतीचे माजी सभापती करण खलाटे, ज्येष्ठ सदस्य शांताराम इंगवले, विक्रम खुटवड, माजी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, तुषार थोरात यांची नावे चर्चेत आहेत.

परंतु सुनेत्रा पवार उपाध्यक्षपदासाठी महिलेला संधी देणार का, याकडेही महिला सदस्यांचे लक्ष लागले आहे. अशातच काही इच्छुकांनी आणि त्यांच्या समर्थक नेत्यांनी सह्यांची मोहीम राबवली असल्याचं समोर आला आहे. हे नेते जिल्हा परिषद सदस्य आणि वरिष्ठ नेत्यांना भेटून त्यांच्याकडून अध्यक्षपदासाठी या उमेदवाराला पाठिंबा आहे, अशा पत्रावर सह्या घेताना पाहायला मिळत आहेत.

सदस्य देखील या पत्रावर सह्या करत आहेत. याबाबत सदस्य सांगतात, " पाठिंबा किंवा पत्रावर सही मागितली तर आम्ही कोणाला नाराज करू शकत नाही, शेवटी संबंध असतात. पक्षातील नेते पत्र घेऊन येतात, त्यामुळे आम्ही शिफारस आणि पाठिंब्याच्या पत्रावर सह्या केल्या. त्यांना नाही म्हणता येत नव्हते. मात्र, हे पत्र म्हणजे आमचा पाठिंबा आहे, असे नेत्यांनी मानू नये", असं देखील खासगीमध्ये हे जिल्हा परिषद सदस्य सांगत आहेत.

जिल्हा परिषद सदस्यांनादेखील पाठिंब्याच्या पत्रावर सह्या कराव्यात, यासाठी दबावाचे राजकारण गेले आठवड्याभर सुरू आहे. सदस्यदेखील कोणाची नाराजी नको म्हणून सह्या करतात. विशेषतः दौंड आणि इंदापूर तालुक्यांमध्ये हा प्रकार होत असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT