District officials conduct the 2025 Pune Zilla Parishad election reservation draw for 73 member seats across talukas, as per updated government regulations. Sarkarnama
पुणे

Pune ZP Election: एका रहिवाशानं बदललं पुण्यातील प्रभाग रचनेचं चित्र! जिल्हाधिकाऱ्यांनीही मान्य केली चूक

Pune ZP Election 2025 पुणे जिल्हा परिषदेच्या गटांसाठीची आरक्षण सोडत आज जाहीर झाली.

सरकारनामा ब्युरो

Pune ZP Election 2025 : नवीन आरक्षण पद्धतीनुसार अनुसूचित जाती आणि जमाती यांचे आरक्षण हे जिल्ह्यातील गटांमध्ये सर्वाधिक लोकसंख्येच्या गटापासून उतरत्या क्रमानं काढणं अपेक्षित आहे. मात्र, अनुसूचित जाती गटाचे आरक्षण काढताना हवेली तालुक्यातील लोणी काळभोर गटाऐवजी इंदापूर तालुक्यातील भिगवण गट आरक्षित असल्याचं सांगण्यात आलं. तेव्हा उरुळीकांचन येथील रहिवाशी देवा गायकवाड यांनी भिगवण गटातील अनुसूचित जातीची लोकसंख्या लोणी काळभोरपेक्षा कमी असल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या निदर्शनास आणून दिलं. तेव्हा डुडी यांनी देखील निवडणूक शाखेची चूक झाल्याचं मान्य केलं आणि अनुसूचित जातीसाठी भिगवणऐवजी लोणीकाळभोर गटाची सोडत काढली.

पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी ७३ गटांसाठीची आरक्षणाची सोडत सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सोडतीनुसार अनुसूचित जातीसाठी ७, अनुसूचित जमातीसाठी ५, तर नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी १९ गट राखीव झाले आहेत. त्यापैकी १० जागा महिलांसाठी राखीव आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४२ गट राखीव असून, त्यापैकी २० गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. एकूण ७३ गटांपैकी ३७ गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती सात गट असून त्यापैकी चार गट महिलांसाठी, अनुसूचित जमातीसाठी पाच गट असून त्यापैकी ३ गट महिलांसाठी तर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी १९ गट राखीव असून त्यापैकी दहा गट हे महिलांसाठी राखीव झाले आहेत. विविध प्रवर्गांनुसार सदस्यपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या हस्ते आज लॉटरी पद्धतीने ही सोडत काढण्यात आली. किरकोळ वाद वगळता आरक्षण सोडत सुरळीत पार पडली. परंतु आरक्षणाचा फटका काही दिग्गजांना बसला असून त्यांना आता पर्याय शोधावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव गट

इंदापूर – ७१ लासुर्णे

इंदापूर – ७० वालचंदनगर

बारामती – ६१ गुणवडी

हवेली – ४१ लोणीकाळभोर

अनुसूचित जाती (पुरुष) प्रवर्गासाठी राखीव गट

बारामती- ६५ निरावागज

दौंड -४५ गोपाळवाडी

हवेली- ३९ उरुळीकांचन

अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव गट

जुन्नर – ८ बारव

जुन्नर – १ डिंगोरे

आंबेगाव – ९ शिनोली

अनुसूचित जमाती (पुरुष) प्रवर्गासाठी राखीव गट

खेड- २१ वाडा

मावळ- २९ टाकवे बुद्रूक

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी राखीव गट

खेड – २२ कडुस

बारामती – ६० सुपा

हवेली – ४० थेऊर

शिरूर – १५ न्हावरा

जुन्नर – ४ राजुरी

जुन्नर – ६ नारायणगांव

जुन्नर – २ ओतूर

पुरंदर – ५३ नीरा शिवतक्रार

जुन्नर – ५ बोरी बुद्रूक

इंदापूर – ६७ पळसदेव

नागरिकांचा मागास (पुरुष) प्रवर्गासाठी राखीव गट

हवेली – ३७ पेरणे-

वेल्हे – ५५ वेल्हे बुद्रूक

खेड – २५ मेदनकरवाडी

मुळशी – ३६ पिरंगुट

शिरूर – २० मांडवगण फराटा

दौंड – ४९ यवत

आंबेगाव – १३ अवसरी बुद्रूक

भोर – ५६ वेळू

मुळशी- ३४ पौड

सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव गट

खेड – २३ रेटवडी

दौंड – ४७ पाटस

बारामती – ६३ वडगाव निंबाळकर

शिरूर – १९ तळेगाव ढमढेरे

इंदापूर – ६९ निमगाव केतकी

मावळ – ३१ खडकाळे

आंबेगाव – ११ कळंब

दौंड – ४४ वरवंड

शिरूर – १८ शिक्रापूर

आंबेगाव – १० घोडेगाव

मावळ – ३० इंदुरी

हवेली – ४२ खेड शिवापूर

खेड – २६ पाईट

इंदापूर – ६६ भिगवण

शिरूर – १६ रांजणगाव गणपती

खेड – २८ कुरुळी

मावळ – ३३ सोमाटणे

इंदापूर – ७३ बावडा

पुरंदर – ५० गराडे

हवेली – ३८ कोरेगाव मुळ

सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव जागा

शिरूर-१७ पाबळ

जुन्नर- ३ आळे

भोर- उत्रौली

दौंड- ४६ खडकी

बारामती-६२ पणदरे

आंबेगाव- १२ पारगाव तर्फे अवसरी बुद्रूक

पुरंदर ५२ वीर

दौड - ४८ बोरीपार्धी

मुळशी- हिंजवडी

पुरंदर- ५१ बेलसर

खेड- २४ पिंपळगाव तर्फे खेड

जुन्नर- ७ सावरगाव

दौंड ४३ राहू

भोर- ५७ भोंगवली

शिरूर- १४ कवठे येमाई

मावळ -३२ कुसगाव बुद्रूक

वेल्हे- ५४ विंझर

इंदापूर- ७२ काटी

बारामती-६४ निंबूत

खेड-नाणेकरवाडी

इंदापूर- ६८ वडापुरी

भोर- ५८ भोलावडे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT