Amravati Election: भाजप निष्ठावंतांना आता राणा, राष्ट्रवादीची पालखी वाहण्याची गरज नाही! CM फडणवीसांचे संकेत

Amravati Municipal Election 2025 : लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढवली होती. दोन्ही निवडणुकीत जागा वाटपावरून मोठे मतभेद झाले होते.
Amaravati Election
Amaravati Election
Published on
Updated on

Amravati Municipal Election 2025 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील महायुतीबाबत मोठे विधान केले आहे. त्यामुळं आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी जे झालं ती वेळ आता भाजपच्या निष्ठावंतांवर येणार नाही. म्हणजेच अमरावती महापालिकेत त्यांना आता रवी राणा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पालखी वाहण्याची गरज पडणार नाही.

Amaravati Election
Bhandara Election: "‘फालतू' माणसाला भाजपात प्रवेश कसा?"; शिंदे सेनेचा संताप; बानवकुळेंनीच दिली होती उपाधी

लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढली होती. दोन्ही निवडणुकीत जागा वाटपावरून मोठे मतभेद निर्माण झाले होते. भाजपच्या अनेक नेत्यांनी बंडखोरी केली होती. लोकसभेत भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली होती. विधानसभेत रवी राणा यांना तिकीट दिले.

यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. भाजपच्या अनेक निष्ठावंतांनी नेत्वृवालाच आव्हान दिले होते. उघडपणे मित्रपक्षाचे काम करणार नाही सांगितले होते. महापालिकेच्या निवडणुकीत महायुती कायम ठेवल्यास आणखी असंतोष निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या विधानाने भाजपच्या इच्छुकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Amaravati Election
RSS Camp Sexual Abuse: IT इंजिनिअरच्या मृत्यूवर प्रियांका गांधी भडकल्या; RSS बाबत केली 'ही' मोठी मागणी

मुख्यमंत्र्यांनी सोमवारी अमरावती महापालिका निवडणुकीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी भाजपचे इरादे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांची स्वबळावर निवडणूक लढण्याची नेहमीच इच्छा असते. उमेदवारांची संख्याही भरपूर असते. सर्वांना निवडणूक लढता आली पाहिजे. त्यामुळे त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्यात येईल. जिथे शक्य तिथे युती करण्याचा प्रयत्न केला जाईल. जिथे शक्य नसेल तिथे समोरासमोर लढू असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीकरिता आमची यंत्रणा पूर्ण सज्ज आहे. युतीच्या संदर्भात देखील आम्ही स्थानिक पातळीवर अधिकार देत आहोत. जिथे युती शक्य आहे, त्याठिकाणी आम्ही युती करणार आहोत, पण युती झाली नाही तर मात्र मित्रपक्षावर कुठे टीका करू नये, अशा सूचना व निर्देश आम्ही कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही पक्षांना चांगले यश मिळेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी यावेळी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com