Pune ZP Result News : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा बोलबाला पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर मोठं बहुमत मिळवले असून जिल्हा परिषद सदस्यांचा आकडा 50 पर्यंत गेला आहे. असे असताना देखील दिवंगत अजितदादांच्या अनेक शिलेदारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचा भोर तालुक्यातील महत्त्वाचा चेहरा आणि अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे रणजीत शिवतारे यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे.
माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नीने शिवतारे यांचा केला आहे. मागील जिल्हा परिषदेच्या सत्ता काळामध्ये रणजीत शिवतारे हे उपाध्यक्ष पदावर होते. त्यामुळे यंदा त्यांना अध्यक्षपदाचा शब्द दादांनी दिला होता असं सांगितलं जात होतं. तसेच गेल्या काही काळापासून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोरमधील आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली होती. विधानसभा निवडणुकीमध्ये संग्राम थोपटे यांचा पराभव केल्यानंतर आमदार शंकर मांडेकर यांना दादांनी मोठी रसद दिली होती.
मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद वाढत असल्याचं पाहून काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. त्यानंतर भोर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये थोपटे विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष रंगला. यात थोपटे यांनी सर्वाधिक जागा जिंकल्या, पण नगराध्यक्ष मात्र राष्ट्रवादीचा झाल्याने हा थोपटेंना मोठा धक्का मानला जातं होता. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तर संग्राम थोपटे यांनी थेट आपल्या पत्नीलाच निवडणूक रिंगणामध्ये उतरवलं होतं.
पत्नी स्वरूपा थोपटे यांना थेट रणजीत शिवतारे यांच्या विरोधात मैदानात उतरवल्याने ही निवडणूक अधिक रंगतदार झाली होती. रणजीत शिवतारे यांना भोरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वात मोठा चेहरा मानला जातो. त्यांचा जर पराभव केला तर राष्ट्रवादीचं वाढणारं वर्चस्व कमी होण्यास मदत होईल या दृष्टिकोनातून थोपटे यांनी हा निर्णय घेतला असल्याचा सांगितलं जात होतं.
कुठेतरी थोपटे यांना यामध्ये यश आले असल्याचे देखील बोलले जात आहे. मात्र पूर्ण भोर तालुक्याचा विचार केल्यास भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं संमिश्र चित्र पाहायला मिळालं. काही ठिकाणी राष्ट्रवादी तर काही ठिकाणी भाजपने विजय मिळवला असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे हो तालुक्यात कोणाची ही एक हाती सत्ता आल्याची पाहायला मिळत नाही.
जिल्हा परिषद सदस्य
१) विक्रम दादा खुटवड
२) प्रवीण बाळासाहेब जगदाळे
१) विशाल उर्फ बंटी कोंडे
२) सौ. तृप्ती ताई खुटवड
३) राजेश साहेबराव बोडके
४) सौ मनीषा संतोष कंक
भारतीय जनता पार्टी
१) पोपट नारायण सुके
२) सौ. स्वरूपा संग्राम थोपटे
पंचायत समिती सदस्य
१) सौ. गीता आनंदराव आंबवले
२) सौ सुषमा विक्रम चव्हाण
३) रोहन दिलीपराव बाठे
४) ज्ञानेश्वर पांगारे
वरील सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले आहेत..
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.