Pune ZP Elections Ajit Pawar  sarkarnama
पुणे

Pune ZP Election: पुणे झेडपीत कुणाची सत्ता? मतदारांची अजितदादांना साथ, NCP नंबरचा वन पक्ष? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी समोर

Pune ZP News: पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी तोंडावरच अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे भाजपने प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही या निवडणुकीत प्रचारही केला नव्हता.

Deepak Kulkarni

Pune ZP News: गेल्या जानेवारी महिन्यात राज्यातील 29 महापालिका निवडणुकीनंतर 12 जिल्हा परिषदांसह 125 पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी शनिवारी(ता.7 फेब्रुवारी) रोजी मतदान पार पडले. त्यानंतर आता 'साम टीव्ही'कडून करण्यात आलेल्या या एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. राज्यातील 12 जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 7438 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात राज्यात पुन्हा एकदा महायुतीचा डंका दिसून येत आहे.

राज्यात भाजप महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषदेतही नंबरचा वनचा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. पण राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतरही पुणे झेडपीत राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाच 'एक्झिट पोल'मधून समोर आलेल्या आकड्यांवरुन दिसून येत आहे.

अजित पवारांनी प्रचंड ताकद लावूनही पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत मतदारांनी भाजपच्याच पारड्यात कौल देत दोन्ही महानगरपालिकांमध्ये एकहाती सत्ता दिली होती. या निकालानंतर अजितदादांनी मिश्किल भाषेत पुणेकरांनी आपल्याला कमी प्रतिसाद दिल्याची खंतही जाहीरपणे बोलून दाखवली होती. पण त्यानंतर झालेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी अजित पवारांनाच साथ दिल्याचं दिसतंय.

पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी तोंडावरच अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे भाजपने प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही या निवडणुकीत प्रचारही केला नव्हता. पण तरीही मतदारांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मनापासून साथ दिल्याचं समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकड्यांवरुन समोर येत आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठं कमबॅक केलं आहे. पुणे झेडपीच्या एकूण 73 जागांपैकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 30 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 10 जागा मिळण्याची शक्यता आहे.

मात्र,महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला 20 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 10 जागा मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार समोर येत आहे. काँग्रेसला 1 तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे.

सांगली जिल्हा परिषदच्या 61 जागांसाठी 211 जण तर पंचायत समिती 122 जागांसाठी 327 उमेदवार रिंगणात होते. मात्र, एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप जयंत पाटलांना मोठा धक्का देणार असल्याचं समोर येत आहे.

सातारा जिल्ह्यातील 65 जिल्हा परिषद गट आणि 330 पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडलं. साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार सातारा जिल्ह्यात भाजपकडे सत्ता येण्याची शक्यता आहे. सातारा झेडपीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची एक हाती सत्ता होती. मात्र, यंदा भाजप मुसंडी मारत सत्ता मिळवू शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT