Congress Politics : महापालिका, ZP च्या धामधुमीतच काँग्रेसचा महाराष्ट्रात नवा प्रयोग; सलगच्या पराभवांची मरगळ झटकून सुरु केली 2029 ची तयारी

Congress Politics : २०२९ च्या लोकसभेसाठी काँग्रेसने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून वंचित, रासप आणि ओबीसी बहुजन आघाडीसारख्या नवीन मित्रांना सोबत घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नवीन राजकीय प्रयोग राबवले आहेत.
Congress leaders in Maharashtra strategizing with new alliance partners like Prakash Ambedkar (VBA) and Prakash Shendge (OBC Bahujan Aghadi) to consolidate a diverse voter base for upcoming major elections.
Congress leaders in Maharashtra strategizing with new alliance partners like Prakash Ambedkar (VBA) and Prakash Shendge (OBC Bahujan Aghadi) to consolidate a diverse voter base for upcoming major elections.Sarkarnama
Published on
Updated on

Congress Politics : नगर परिषद निवडणुकीपासूनच काँग्रेसने नव्या मित्रांचा शोध सुरू केल्याचे दिसले. वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या नव्या मित्रांसोबत स्थानिक निवडणुका काँग्रेसने लढल्या आहेत. आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी बहुजन आघाडीच्या माध्यमातून आणखी एक नवा मित्र जोडला आहे. हे प्रयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असले, तरीही काँग्रेस लोकसभेची चाचपणी करताना दिसत आहे.

आतापर्यंत झालेल्या नगर परिषद व महापालिका निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजपला कौल देताना, भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला पसंती दिल्याचे दिसून येते. नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसने विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यापेक्षा सरस कामगिरी केली आहे. महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्रित आले होते, मात्र मुंबईच्या बाहेर त्यांच्या एकत्रित येण्याचा फारसा फायदा झाला नसल्याचे महापालिका निवडणूक निकालातून दिसले. तशीच स्थिती दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रित येण्याची आहे. त्या तुलनेत काँग्रेसने चांगली कामगिरी केल्याचे मानले जात आहे. ना कोणता राज्यव्यापी फायरब्रँड नेता, ना कोणती सत्ता अशा बिकट स्थितीत भाजपचा खरा विरोधक काँग्रेसच, हा संदेश आता जनमानसात रुजताना दिसत आहे. लोकांमध्ये असलेली हीच भावना येत्या काळात काँग्रेसला अधिक भक्कम करण्याची शक्यता आहे. त्यातच काँग्रेसचे नवे राजकीय मित्र महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारल्यास येत्या काळात वेगळे चित्र दिसण्याची शक्यता आहे.

नेत्यांविना लक्षणीय कामगिरी

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसचे ३२४ नगरसेवक विजयी झाले आहेत. भाजपचे सर्वाधिक १४२५ नगरसेवक विजयी झाले आहेत. त्या खालोखाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे ३९९ नगरसेवक विजयी झाले आहेत. या यादीत काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातील २९ महापालिकांपैकी ठाणे, नवी मुंबई, धुळे, जळगाव, पिंपरी-चिंचवड व इचलकरंजी या सहा महापालिकांमध्ये एकही नगरसेवक विजयी न होता काँग्रेसने तिसऱ्या क्रमांकावर घेतलेली झेप अनेकांच्या झोपा उडवून टाकणारी आहे. भिवंडी-निजामपूर, कोल्हापूर, लातूर आणि चंद्रपूर या ठिकाणी काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष झाल्याने येथे महापौरपदाची संधी आहे. मीरा-भाईंदर, सांगली, अमरावती, अकोला, परभणी या महापालिकांमध्ये काँग्रेसने केलेली कामगिरी वाखणण्याजोगी आहे. या स्थानिक निवडणुकीत काँग्रेसचे खासदार, आमदार व स्थानिक माजी नेते किती नेटाने लढले? यावर काँग्रेसची कामगिरी झाल्याचे दिसते. धुळ्यात काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव असतानाही धुळे महापालिका निवडणुकीत काँग्रेसला साधे खातेही का उघडता आले नाही? याची माहिती प्रदेश काँग्रेसने वेळीच घेण्याची गरज आहे.

Congress leaders in Maharashtra strategizing with new alliance partners like Prakash Ambedkar (VBA) and Prakash Shendge (OBC Bahujan Aghadi) to consolidate a diverse voter base for upcoming major elections.
Congress corporators : काँग्रेससोबत दगाबाजी केलेल्या 16 नगरसेवकांचं पद धोक्यात : भाजपला दिलेला पाठिंबा अंगलट येणार?

ग्रामीण भागात संधी

पहिल्या टप्प्यात राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २० जिल्हा परिषदांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात होत असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने ताकद लावली आहे. महाराष्ट्राच्या शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचे प्रश्‍न वेगळे आहेत. शेती आणि शेतकऱ्यांशी निगडित असलेल्या या निवडणुका भाजपसाठी मोठे आव्हान, तर काँग्रेससाठी नामी संधी मानली जात आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात १२ जिल्हा परिषदांसाठी मतदान व मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सत्ताधारी महायुतीला घेरण्याच्या तयारीत दिसत आहेत. त्यासाठी स्थानिक प्रश्‍नांसह शेतमालाचा हमीभाव, शक्तिपीठ महामार्ग, अतिवृष्टी व महापुरातील अनुदान या मुद्द्यांचा आधार घेतला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर राज्यात विधानपरिषदेच्या नागपूर, पुणे व छत्रपती संभाजीनगर पदवीधर व पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची तयारीही काँग्रेसने केल्याचे समजते.

आकडे बोलतात...

२९ महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक

मुंबई : २४

कल्याण-डोंबिवली : २

उल्हासनगर : १

भिवंडी-निजामपूर : ३०

मीरा-भाईंदर : १३

वसई-विरार : १

पनवेल : ४

नाशिक : ३

मालेगाव : ३

धुळे : ०

जळगाव : ०

अहिल्यानगर : २

पुणे : १५

पिंपरी-चिंचवड

सोलापूर : २

कोल्हापूर : ३४

इचलकरंजी : ०

सांगली-मिरज-कुपवाड : १८

छत्रपती संभाजीनगर : १

नांदेड-वाघाळा : १०

लातूर : ४३

परभणी : १२

अमरावती : १५

अकोला : २१

नागपूर : ३४

चंद्रपूर : २७

जालना : ९

ठाणे : ०

नवी मुंबई : ०

एकूण : ३२४

Congress leaders in Maharashtra strategizing with new alliance partners like Prakash Ambedkar (VBA) and Prakash Shendge (OBC Bahujan Aghadi) to consolidate a diverse voter base for upcoming major elections.
Chandrapur Mahapalika: चंद्रपूरच्या महापौर पदाबाबत मोठा निर्णय; काँग्रेसनं धानोरकरांसह वडेट्टीवारांचीही मर्जी राखली, असा काढला तोडगा

तीन मोठे पराभव

1. लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पंढरपूर, सोलापूर शहर मध्य व अक्कलकोट या तीन जागा लढल्या. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील या तिन्ही जागांवर काँग्रेसचा पराभव झाला. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या म्हणून पंढरपुरातील महाविकास आघाडीतील तिढा सोडविण्यात त्यांना अपयश आले. या अपयशातूनच भगीरथ भालके यांचा पराभव झाल्याचे मानले जात आहे. भालकेंनी काँग्रेसची साथ सोडत तीर्थक्षेत्र विकास आघाडी म्हणून पंढरपूर व मंगळवेढ्याची निवडणूक लढली आणि जिंकली. विधानसभेतील पराभवानंतर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. दुधनी नगरपरिषद भाजपच्या विरोधात जिंकली. उमेदवारी यादीत नाव होते, परंतु सोलापूर दक्षिणसाठी काँग्रेसचा ए व बी फॉर्म न मिळालेले माजी आमदार दिलीप माने भाजपच्या कृपादृष्टीने सोलापूर बाजार समितीचे सभापती झाले आहेत. आता दिलीप मानेच भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत.

2. सोलापूर लोकसभा मतदारसंघात पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी या पाच नगरपरिषदा येतात. या पाचही ठिकाणी नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. अक्कलकोटमध्ये फक्त दोनच नगरसेवक विजयी झाले आहेत. या भागाच्या खासदार म्हणून जेवढे लक्ष प्रणिती शिंदे यांनी द्यायला हवे होते, तेवढे लक्ष न दिल्याने काँग्रेसचा मानहानीकारक पराभव झाल्याचे आता कार्यकर्ते उघडपणे बोलू लागले आहेत.

3. सोलापूर महापालिकेतील १०२ पैकी फक्त २ जागांवर काँग्रेस विजयी झाले आहे. या दोन प्रभागातील काँग्रेसच्या पॅनेलमधील इतर उमेदवार पडले व फक्त दोघेच विजयी झाले आहेत. विजयी झालेल्यांसाठी ‘क्रॉस व्होटिंग’ झाले आहे, म्हणजे या ठिकाणी पक्षापेक्षा व्यक्ती महत्त्वाचा ठरला आहे. काँग्रेसच्या खासदार म्हणून महाविकास आघाडीतील इतर प्रमुख पक्षांनी प्रणिती शिंदे यांच्यावर महापालिका निवडणुकीत मोठा विश्‍वास टाकला होता. निवडणुकीपूर्वी सोलापूरला वेळ न देणे, महाविकास आघाडी म्हणून मोर्चेबांधणी न करणे, प्रचाराची रणनीती न आखणे या सर्वांचा परिणाम म्हणजे काँग्रेसचा, महाविकास आघाडीचा दारुण पराभव मानला जात आहे. या पराभवाला खासदार प्रणिती शिंदे यांनाच जबाबदार धरले जात आहे.

काँग्रेसचे नवे फायटर हिरो :

जुन्या मित्रांना सोडून नव्या मित्रांसोबत काँग्रेसने महापालिका निवडणूक लढली. या निवडणुकीत काँग्रेसने मुंबई, भिवंडी-निजामपूर, कोल्हापूर, लातूर व चंद्रपूर या ठिकाणी दमदार कामगिरी केली आहे. महापालिका निवडणुकीने काँग्रेसला नवे फायटर हिरो दिले आहेत. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते खचले होते. काँग्रेस सोडून गेलेले अनेक दिग्गज नेते, ना स्टार प्रचारक, ना सत्ता या पार्श्वभूमीवर फायटर हिरो पुढे आले आहेत.

मुंबईच्या प्रदेशाध्यक्षा तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई महापालिकेत दमदार कामगिरी केली आहे. माजी मंत्री नसीम खान यांनी भिवंडी-निजामपूरचे प्रभारी म्हणून आपला ठसा उमटविला आहे. कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. लातूर महापालिकेत आमदार अमित देशमुख व माजी आमदार धीरज देशमुख या भावांचा करिष्मा चालला आहे. इथे दिवंगत विलासराव देशमुख ब्रँड पुन्हा एकदा पॉवरफुल्ल ठरल्याचे दिसले आहे.

चंद्रपूर महापालिकेत ज्येष्ठ आमदार विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांची कामगिरी भाजपपेक्षा सरस ठरली आहे. येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, विधानपरिषद व इतर निवडणुकीत काँग्रेसने फायटर हिरोंना राज्यभर प्रचाराची संधी दिल्यास त्याचा मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. चंद्रपुरात नव्या-जुन्या नेत्यांमधील शीतयुद्ध कायमच चर्चेत राहिले आहे. भाजपचे ज्येष्ठ आमदार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार विरुद्ध नवखे आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील शीतयुद्ध चर्चेत होते. आता काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार विजय वडेट्टीवार विरुद्ध नवख्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील शीतयुद्धही चर्चेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com