A dramatic scene unfolded during the Pune Zilla Parishad general body meeting after a young woman allegedly attempted suicide, with serious allegations levelled against Mangesh Jagtap. sarkarnama
पुणे

Pune ZP : धक्कादायक! पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; झेडपी सदस्यावर गंभीर आरोप

Pune ZP Woman Attempts Suicide : पुणे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असताना तरुणीने अचानक सभागृहात प्रवेश केला आणि सोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेत स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान सोमवारी एक धक्कादायक प्रकार समोर आला. बारामतीमधील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांनी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत एका तरुणीने भरसभेत अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत तरुणीला रोखल्याने मोठा अनर्थ टळला.

​मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असताना ही घटना घडली. सभेत विविध मुद्द्यांवर चर्चा रंगलेली असतानाच या पीडित तरुणीने अचानक सभागृहात प्रवेश केला आणि सोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. मात्र, प्रसंगावधान दाखवत तेथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षारक्षकांनी तरुणीला तात्काळ रोखल्याने मोठा अनर्थ टळला.

​पीडित तरुणीने बारामतीमधील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. जगताप हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करत असल्याचा दावा या तरुणीने केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने आणि प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने अखेर उद्विग्न होऊन हे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचे तिने स्पष्ट केले.

पोलीस बंदोबस्त वाढवला

​घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तरुणीला ताब्यात घेऊन उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती स्थिर आहे. या धक्कादायक घटनेनंतर जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT