Pune primary schools sarkarnama
पुणे

Pune ZP: पालकांनो लक्ष द्या! पुणे जिल्ह्यातील शाळांची वेळ बदलली; काय आहे जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय?

Pune School Timing Change, Pune ZP Schools, Pune Education News: मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेमुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण प्राथमिक शाळांची वेळ १३ ते ३० जुलैदरम्यान सकाळी ७ ते दुपारी १२.३० अशी करण्यात आली आहे.

Sudesh Mitkar

Pune School Timing Change: विधानसभा मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमुळे आता पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. शिक्षकांवर असलेली 'बीएलओ'ची म्हणजेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून जबाबदारी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी १३ ते ३० जुलैदरम्यान सर्व प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिले आहेत.

त्यामुळे शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातील शाळांच्या वेळेतही हा तात्पुरता बदल लागू होणार आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या नवीन परिपत्रकानुसार, शाळांची वेळ सकाळी ७ ते दुपारी १२.३० अशी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार सकाळी ७.०० वाजता:शाळा सुरू (स्वच्छता आणि परिपाठ) आणि दुपारी १२.३० वाजता नियमित तासिकेनंतर शाळा सुटणार आहेत. शनिवारी मात्र शाळा नेहमीच्या ठरलेल्या वेळेनुसारच भरवली जाईल, त्यात कोणताही बदल नाही.

का घेतला निर्णय?

राज्यात सध्या मतदार याद्या दोषविरहित आणि अचूक करण्यासाठी विशेष मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. या राष्ट्रीय कामासाठी पुणे जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शिक्षकांची 'बीएलओ' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शिक्षकांना अध्यापनाचे कर्तव्य बजावून मतदार यादीचे कामही प्रभावीपणे पार पाडता यावे, यासाठी हा सुवर्णमध्य काढण्यात आला आहे. सकाळच्या सत्रात शाळा आटोपल्यानंतर शिक्षकांना दुपारी बीएलओच्या कामासाठी पूर्ण वेळ देता येणार आहे.

तर कारवाई होणार

"ज्या शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती झालेली नाही, त्यांनी इतर सहकाऱ्यांना शैक्षणिक आणि प्रशासकीय कामात मदत करावी. शाळाप्रमुखांनी अंतर्गत कामाचे नियोजन अशा पद्धतीने करावे, जेणे करून बीएलओ शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण पडणार नाही," असे स्पष्ट निर्देश सीईओ गजानन पाटील यांनी दिले आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी करून सर्व शाळांना केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल विहित नमुन्यात आणि दिलेल्या मुदतीत जिल्हा परिषदेकडे सादर करावा लागणार आहे. यात कोणतीही कसूर खपवून घेतली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT