Vijay Shivtare decision shocks Bharatiya Janata Party in Purandar Sarkarnama
पुणे

Vijay Shivtare Strategy: शिवतारेंच्या एका निर्णयाने भाजपला मोठा धक्का! पुरंदरमध्ये शेवटच्या क्षणी काय घडलं?

Purandar Panchayat Samiti Election Result: एकीकडे संजय जगताप यांच्या नेतृत्वातील भाजप सत्तेच्या वाटाघाटी करत होते. तर दुसरीकडे विजय शिवतारे यांच्या नेतृत्वातील शिवसेना राष्ट्रवादीसोबत युती करण्यासाठी आग्रही होती.

Sudesh Mitkar

Pune News, 10 March 2026: पंचायत समिती निवडणुकीचा निकाल काल (सोमवारी) लागला. सभापती आणि उपसभापती निश्चित झाले आहेत. अनेक ठिकाणी बहुमताची समीकरणे जुळवण्यासाठी वेगवेगळ्या युती आघाड्या अस्तित्वात आल्या. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्ष वेगवेगळे निवडणूक लढले असले तरी आता एकत्रित येत सत्ता स्थापन करताना पाहायला मिळाले.

पुणे जिल्हा परिषदेची स्थिती पाहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचंड असे बहुमत या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परंतू पुणे जिल्ह्यातील अनेक पंचायत समितीमध्ये राजकीय पेच फसला होता. पुरंदर पंचायत समितीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षाला स्पष्ट असं बहुमत मिळलं नव्हते. सर्वाधिक जागा या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या असून यांचे चार सदस्य निवडून आले आहेत.

तर भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रत्येकी दोन सदस्य विजयी झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमतासाठी एका सदस्याच्या पाठिंबाची आवश्यकता होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतल्या नेमक्या कोणत्या पक्षाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार याबाबत तालुक्यात प्रचंड उत्सुकता होती.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वातील भाजप सत्तेच्या वाटाघाटी करत होते. तर दुसरीकडे आमदार विजय शिवतारे यांच्या नेतृत्वातील शिवसेना राष्ट्रवादीसोबत युती करण्यासाठी आग्रही होती.

भाजप राष्ट्रवादीसोबत युतीच्या चर्चा करून उपसभापती पद आपल्या पदरात पाडून घेण्याच्या तयारीत असतानाच विजय शिवतारे यांनी एक राजकीय खेळी करत राष्ट्रवादी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दर्शवला होता. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही खेळी त्यांनी खेळी होती.

त्यानंतर काल झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती तर उपसभापती पद हे शिवसेने आपल्या पदरात पाडून घेतले आहे. त्यामुळे भाजप नेते आणि माजी आमदार संजय जगताप यांच्यासह भाजपला मोठा धक्का शिवतारेंनी दिला असल्याचे बोलेले जाते.

पुरंदर पंचायतसमितीच्या निवडणुकीतील दिवे गणातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमित झेंडे यांची सभापतिपदी तर वीर गणातील शिवसेनेचे प्रवीण बाळासाहेब जगताप यांची उपसभापती म्हणून निवड झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT