NCP News: राष्ट्रवादीनं 'हवेली' ताब्यात घेतली!अपक्षाच्या पाठिंब्यानं सत्तेची गणिते जुळली!

Haveli Panchayat Samiti Election Result Yuvraj Kakade chairman: हवेली पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी 7 सदस्यांचा ‘मॅजिक फिगर’ आवश्यक होती. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागांवर विजय मिळाला होता.
Haveli Panchayat Samiti Election Result
Haveli Panchayat Samiti Election ResultSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 9 March 2026: हवेली पंचायत समिती अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला. अपक्षाच्या पाठिंब्यामुळे सत्ता स्थापन झाली आहे. सभापतीपदी युवराज हिरामण काकडे तर उपसभापतीपदी अपक्ष सदस्य विद्या दत्तात्रय गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सभापती व उपसभापती पदासाठी हवेली पंचायत समितीच्या सभागृहात आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी युवराज काकडे तर उपसभापती पदासाठी विद्या गायकवाड यांचा एकमेव अर्ज दाखल आला होता. यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

हवेली पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी 7 सदस्यांचा ‘मॅजिक फिगर’ आवश्यक होती. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी केवळ एक जागेचा पेच राष्ट्रवादी काँग्रेससमोर होता. त्यानंतर बैठका सुरु झाला. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला.

Haveli Panchayat Samiti Election Result
Unmesh Patil News: भाजपचं टेन्शन वाढलं! एकनाथ शिंदेंचे उमेश पाटलांना बळ; जळगावात राजकीय गणितं बदलणार?

विद्या दत्तात्रय गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचे जाहीर केले. त्यांच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ 7 वर पोहोचले आणि हवेली पंचायत समितीवरील सत्तेचा मार्ग मोकळा झाला. या राजकीय डावपेचांनंतर राष्ट्रवादीनेही रणनीती आखत अपक्ष विद्या गायकवाड यांना उपसभापतीपदाची संधी देत पंचायत समिती ताब्यात घेतली. या निवडीमुळे हवेली तालुक्यातील पुढील राजकीय समीकरण बदलणार आहे.

Haveli Panchayat Samiti Election Result
अजित पवारांचे सुपुत्र खासदार पार्थ पवार हे किती कोटींचे मालक; एकूण संपत्ती किती?

गावागावातील रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधा यावर विशेष भर देत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील, हवेली तालुक्यातील विकासकामांना गती देण्यासाठी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम केले जाईल.असे नवनिर्वाचित सभापती युवराज काकडे यांनी माध्यमांना सांगितले.

पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे विद्या गायकवाड यांनी सांगितले. विद्या दत्तात्रय गायकवाड यांनी देखील सभागृहातील सर्व सदस्यांच्या सहकार्याने तालुक्यातील नागरिकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com