Supriya Sule , Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Supriya Sule News : फडणवीसांच्या 'गृहखात्या'वर प्रश्नचिन्ह; खासदार सुळेंनी केली 'ही' मागणी

Deepak Kulkarni

Pune News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत. यामुळे सरकारसह पोलिस यंत्रणांवरील दबाव चांगलाच वाढला आहे.तर दुसरीकडे राज्यातील कायदा - सुव्यवस्थेवरुन विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे.

खासदार सुप्रिया सुळे सोमवारी (ता.19) एका कार्यक्रमासाठी आल्या असताना त्यांनी पुण्यात मीडियाशी संवाद साधला.यावेळी त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) गृहमंत्रालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.तसेच त्यांच्या गृहखात्याच्या कामाचे ऑडिट करावे,अशी मागणी देखील केली.

खासदार सुळे म्हणाल्या,राज्यात पुणे,नागपूर आणि ठाण्यासह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. हे पूर्णपणे गृहमंत्रालयाचे हे अपयश आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रिपद आल्यापासून गुन्हे वाढले आहेत असे माध्यमेही सांगतात.त्यामुळे महाराष्ट्रात काय सुरु आहे याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी व केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेऊन फडणवीस यांच्या कामाचे ऑडिट करावे, अशी टीका त्यांनी केली.

देशाला पूर्णवेळ कृषिमंत्री नसल्याने या सरकारला धोरण लकवा झालेला आहे. इथेनॉल, कांदा, ऊस यामध्ये सातत्याने धोरण बदलल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. काद्यांवरील निर्यात उठविण्यासाठी आम्ही संसदेत व रस्त्यावरील लढाई केली. ही निर्यातबंदी उठविल्याने आमच्या लढ्याला यश आले आहे असेही खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणूक आली की भाजपला शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर आठवतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिवजयंतीनिमित्तचा कार्यक्रम का रद्द झाला हे माहिती नाही. अरबी समुद्रातील स्मारकाचे भूमिपूजन केले, पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. या सरकारला कोणत्याही समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सोडविता आलेला नाही असेही सुळे म्हणाल्या.

जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या भाजप प्रवेशाबाबत त्या म्हणाल्या, सध्या माझ्यासह रोहित पवार, आव्हाड हे सुद्धा भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रोजच चर्चा असते. आता भाजपकडे २०० आमदार, ३०० खासदार असूनही आमच्याकडचे लोक त्यांना हवे आहेत, याचा अर्थ आमच्यात टॅलेंट आहे. अटलजी, सुषमा स्वराजजी यांचा पक्ष आम्ही पाहिला होता, एकेकाळी सुसंस्कृत असलेल्या पक्षाला काय झाले आहे? असा टोला सुळे यांनी भाजपला मारला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT